मंगळवेढा/ संतसूर्या वृत्तसेवा
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे नेते माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रयत्नाला यश आले असून त्यांनी मंगळवेढा तालुक्यातील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याला महाराष्ट्र शासनाकडून 94 कोटी रुपयाची हमी मिळवून दिली आहे याबाबतचा निर्णय यापूर्वी झाला होता याची नुकतीच अंमलबजावणी होण्यास आता सुरुवात झाली आहे दामाजी साखर कारखान्याच्या उभारणीपासून आर्थिक अडचण उसाचे अडचण कायम राहिली परंतु अलीकडच्या काळात उजनीच्या पाण्यामुळे तालुक्यात ऊस उपलब्ध झाला चार साखर कारखाने चांगल्या पद्धतीने सुरू आहेत अशा परिस्थितीत मंगळवेढा तालुक्याचा हक्काचा असलेला संत दामाजी साखर कारखाना आर्थिक अडचणीत सापडला होता कारखाना सुरू राहण्यासाठी राज्य शासनाकडून थक आम्ही घेणे गरजेचे होते बदलत्या राजकीय परिस्थितीत लोकसभेच्या निवडणुकीत आलेले अपयश पाहता अनेक अडचणी उभा राहतील असे वाटत असताना माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून दामाजी कारखान्याला 94 कोटी रुपयांची थकहमी मिळवून दिली आहे
यामुळे दामाजी कारखान्याचे चेअरमन
शिवानंद पाटील व संचालक मंडळ यांना यावर्षीचा गळीत हंगाम चांगल्या पद्धतीने करता येणार असून कारखान्यांमध्ये आमुलाग्र बदल करून शेतकऱ्यांना चांगला दर देता येणार आहे अनेक प्रकारच्या चांगल्या सुविधा देता येणार आहेत गेल्या दोन वर्षात चेअरमन शिवानंद पाटील व संचालक मंडळाने शेतकरी सभासदांसाठी अनेक हिताचे निर्णय घेतले आहेत ऊस बिल वेळेवर दिले आहे पगार वेळेवर दिले आहेत इतक्याच नव्हे तर हंगामी कर्मचाऱ्यांचा रिटेन्शिअल अलोन्स देखील वेळेवर दिला आहे यामुळे दामाजी कारखान्याबाबत ऊस उत्पादक सभासद समाधानी आहे कारखान्याचे संस्थापक चेअरमन मारवाडी वकील संस्थापक व्हा. चेअरमन रतनचंद शहा कारखान्याच्या हितासाठी झटलेले स्वर्गीय चरनूकाका पाटील या सर्वांना स्मरण करून माजी आमदार प्रशांत परिचारक मार्गदर्शक धनश्री परिवाराचे प्रमुख प्रा शिवाजीराव काळुंगे यांच्या मार्गदर्शनाखाली दामाजी कारखान्याचे संचालक मंडळ चांगल्या पद्धतीने कामकाज करत असल्यामुळे शासनाने देखील 94 कोटी रुपयांची थकली दिली आहे यामुळे पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात शेतकरी वर्गात सभासद वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे
Post a Comment
0 Comments