कोणत्याही परिस्थितीत या भागाला पाणी देणार आमदार समाधानदादा आवताडे यांची मुंबईतून ग्वाही
मंगळवेढा / विक्रांत पंडित
मंगळवेढा तालुक्यातील कायम दुष्काळी असलेल्या 24 गावातील शेतकऱ्यांना शेतीसाठी कोणत्याही परिस्थितीत पाणी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही आमदार समाधान दादा अवताडे यांनी मुंबईतून भ्रमणध्वनीद्वारे दिली यावेळी बोलताना आमदार अवताडे म्हणाले मंगळवेढा तालुक्यातील या कायम दुष्काळी असलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना जनतेला दुष्काळात जन्म नसला तरी मरताना दुष्काळात मरू देणार नाही असा शब्द दिला होता त्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित दादा पवार यांनी या योजनेसाठी आता निधीची तरतूद केली आहे यामुळे लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल अपेक्षेपेक्षा लवकर या भागातील शेतकऱ्यांना आता शेतीसाठी पाणी देणार आहे मी माझ्या विधानसभेच्या निवडणुकीत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील जनतेसाठी जो विकासाचा वचननामा केला होता तो वचननामा पूर्ण केला आहे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत राहिलेले देखील प्रश्न मार्गी लावणार आहे राजकारणासाठी राजकारण न करता समाजकारण करून जनतेच्या हिताचे काम करत आहे यामुळे मी निवडणुकींना राजकारणाला महत्त्व देत असताना अधिक महत्त्व सामाजिक कार्यरत देतो पंढरपूर शहराचा विकास काशीच्या धरतीवर केला जाईल तर मंगळवेढ्यातील बसवेश्वर स्मारक चोखामेळा स्मारक हे प्रश्न देखील मार्गी लावणार आहे मंगळवेढा तालुक्यासाठी जिल्हा रुग्णालय निंबोणी येथे ग्रामीण रुग्णालय असे आरोग्याची प्रश्न सोडवत आणले आहेत.
मतदारसंघात रस्त्याच्या विकासासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून प्रत्यक्ष कामे सुरू झाली आहे मंगळवेढा नगरपालिकेच्या प्राथमिक शाळेच्या इतिहासात प्रथमच साडेचार ते पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे आता इमारती उभा राहून विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळतील आठ कोटीचे नाट्यगृह मंगळवेढ्यातील सांस्कृतिक रसिकांना त्यांची भूक भागवून देणार आहे
निवडणुका येथील जातील राजकारण होत राहील परंतु पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला आहे आपला लोकप्रतिनिधी आपल्यासाठी काय करतो किंवा काय करू शकतो हे दाखवून देण्यासाठी मी आपले आमदारकी पणाला लावली आहे
Post a Comment
0 Comments