Type Here to Get Search Results !

संतसूर्य

पंढरपूर मंगळवेढाकरांच्या मनामनात 
 घरा-घरात  भाचा तानाजीभाऊ खरात
कार्यकर्त्यांचे विठ्ठलाला साकडे
विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात  यासाठी जनमन जोरात
मंगळवेढा/संतसूर्य वृत्तसेवा 

सध्या शेतकऱ्यांचे जिवनमान कष्टमय बनत चालले असून, शेतकऱ्यांच्या कुटूंबाची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. यामुळे खऱ्या आर्थाने शेतकरी वर्गासाठी लढणा-या नेत्यांचा मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये अभाव असल्याकारनाने सामान्य शेतकरी वर्गातील आणि प्रत्येकाला आपलेसे वाटणारे नेतृत्वाची आस येथील जनतेला आहे. यामुळेच दामाजी सहकारी साखर कारखान्यांचे व्हाईस चेअरमन तानाजीभाऊ खरात यांच्याकडे नागरीकांचा ओढा जास्त असून त्यांनी येणाऱी विधानसभेची निवडणूक लढवावी असा जनमानसातून रेटा वाढत आहे. यामुळेच तानाजी खरात विधानसभेच्या निवडणूकीच्या आखाड्यात उतरल्यास भल्य़ा भल्यांना चितपट केल्या शिवाय राहणार नाहीत.
मूढवी गावचे सरंपच, दयावान कुटूंबाचे प्रमुक व दामाजी सहकारी साखर कारखाऩ्याचे व्हाईस चेअरमन पदाच्या अनुशंगाने तानाजी खरात यांनी तालुक्यातील उस उत्पादक शेतकरी वर्ग असेल किंवा इतरही घटक असतील यांच्या मनात आपुलकीचे, प्रेमाचे व विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे. या नात्यातूनच येथील जनतेला आपले कष्ट, आपली परस्थिती, आपल्या पोरा-बाळांचे जीवन बदलण्याचे काम तानाजीभाऊ खरातच करु शकतात याची पुरेपूर जाणीव झाली आहे. कारण आत्ता पर्यंत येथील भोळ्या-भाबड्या जनतेला नेहमीच विकासाचे गाजर दाखवून काही राजकारणी लोकांनी येथील शेतकरी वर्गाची नेहमीच फसवणूक केली आहे. यामुळे स्वप्नांचा भंग झालेल्या येथील जनतेला आता घराघरात आणि मनामनात एकच आशेचा किरण दिसत आहे तो म्हणजे तानाजीभाऊ खरात.
--------
*तानाजीभाऊ यांना पुणे, मुंबई शहरातील मतदारांचा देखील प्रचंड पाठींबाः-*

राजकारणांच्या निष्क्रीयपणामुळे अनेक तरुणांनी रोजगारासाठी पुण्या-मुंबईची वाट धरून गावागावातून स्थलांतर केले आहे. याच घटकाकडून आमच्यासारखी  वण वण व भटकंती तालुक्यातील इतर शेतकरी पुत्रांची होऊ नये म्हणून तालुकयातील राजकीय नेतृत्व बदलणे गरजेचे आहे. याची जाणीव झाली आहे. त्यामुळे तानाजीभाऊ खरात यांच्या सारखा शेतकरी, उसतोडणी कामगारा बद्दल आणि तालुक्यातील अऩेक बेरोजगार तरुणांना एक नवी दिशा देऊ शकतात असा विश्वास वाटत आहे. त्यामुळे मंगळवेढा तालुक्यातील हजारो कुटूंब कामाधंद्यानिमित्त बाहेरच्या शहरात गेले आहेत त्यांचा देखील तानाजीभाऊ खरात यांनी येणारी विधानसभा लढवावी यासाठी प्रचंड पाठींबा असून त्यांना निवडून आणण्यासाठी मतदारसंघात तळ ठोकून राहणार असल्याच्याही भावणा व्यक्त होत आहेत. यासाठी सोमनाथ व्हनमाने, दामाजी मेटकरी, गोविंद सोमुत्ते, आबासाहेब बुरुगले, बाबू ठोंबरे, धनाजी पडोळकर, दिपक कोळेकर, विलास कोळेकर, सोलापूर जिल्हा उत्कर्ष मित्रमंडळ पिंपरी चिंचवडचे सहकार्याध्यक्ष विकास कोळेकर आदी असंख्य कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत. यामुळे तरुणांची ताकद ही तानाजीभाऊ खरात यांच्या पाठीमागे उभी असल्याने खरात यांचे सध्यातरी विधानसभेतील पारडे जड दिसत आहे.

Post a Comment

0 Comments