तावशी येथील वस्ती रस्ता आ समाधान आवताडे यांच्या निधीतून मंजूर
प्रतिनिधी- संतसूर्य
आमदार साहेब जशी आमची वस्ती झाली तवापसनं आम्हाला रस्ता मिळाला नाही...साहेब गेल्या अनेक वर्षापासून शासनाकडे लय अर्ज दिलं....येगळीयेगळी सायब लय येळा येऊन गेली पण रस्ता काय झाला नाही... आता आमच्यासाठी तुम्हालाच काय तर करावं लागेल असा आर्त टाहो आहे पंढरपूर तालुक्यातील तावशी येथील अनुसे-पाटील-चव्हाण वस्तीवर राहणाऱ्या नागरिकांचा आणि महिला माता-भगिनींचा.
गेल्या तीन दिवसांपूर्वी अनुसे-पाटील-चव्हाण वस्ती येथे राहणाऱ्या जनतेने मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांचे कार्यालय गाठून रस्त्या संदर्भात आपली व्यथा आणि अवस्था मांडली. संपूर्ण देशात स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी साजरी होत असताना ही जनता मात्र रस्त्यासारख्या आपल्या मूलभूत आणि पायाभूत विकासापासून दूर आहे. सदर नागरिकांची कैफियत ऐकून घेतल्यानंतर आ आवताडे यांनी लागलीच या वस्तीवरील रस्त्याला भेट देऊन या जनतेच्या रस्त्याच्या अभावी निर्माण झालेली समस्या जाणून घेतली.
या भागातील शेतकरी, शाळकरी विद्यार्थी तसेच दैनंदिन रोजगारासाठी ये-जा करणाऱ्या महिला व इतर नागरिकांना या रस्त्याची किती गरज आहे याची जाणीव मनाशी ठेवून आपल्या प्रयत्नातून आ समाधान आवताडे यांनी अनुसे-चव्हाण-पाटील या रस्त्यासाठी निधी मंजूर करून या रस्त्याचे भूमिपूजन झाले आहे. मतदारसंघातील अनेक प्रलंबित प्रश्नांसाठी करोडो रुपयांचा ऐतिहासिक निधी खेचून आणणाऱ्या आ समाधान आवताडे यांच्या संवेदनशील विकास कृतीचे संपूर्ण मतदारसंघातून अभिनंदन होत आहे.
कोट-अनुसे-पाटील-चव्हाण हा रस्ता वापरण्यायोग्य नसल्यामुळे पाठीमागील काही महिन्याखाली एक वयोवृद्ध आज्जी वारली होती. परंतु सदर मार्गावर हा रस्ता सुव्यवस्थित नसल्याने अंत्यविधी साठी चार खांदेकरीसुद्धा जाणे मुश्किल झाले होते, त्यामुळे मी स्वतः खांद्यावर प्रेत रस्त्याबाहेर काढले होते. परंतु आ समाधान आवताडे यांच्या कानावर ही बातमी घालताच आमदार साहेबांनी हा रस्ता मंजूर केल्याने आमच्या वस्तीवरील तमाम जनतेचा आशीर्वाद आणि शुभेच्छा सदैव आ समाधान आवताडे यांच्या पाठीशी राहतील- अशोक चव्हाण, नागरिक, चव्हाण वस्ती तावशी.
Post a Comment
0 Comments