मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने संदर्भात आ.समाधान आवताडे यांनी घेतली आढावा बैठक
संतसूर्य वृत्तसेवा
राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून महिलांना आर्थिकदृष्ट्या सशक्त करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यभरात लागू झाली आहे. या योजनेबाबत व इतर विकास कामे, शासकीय योजना, सुविधा यांच्या अनुषंगाने मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी प्रांत कार्यालय मंगळवेढा येथे आढावा घेतला व संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या. मुख्यमंत्री लाडकी बहीण व इतर शासकीय विकास कामांच्या पुढील आढावा संदर्भात आ आवताडे यांच्या उपस्थिती मध्ये येत्या गुरुवारी, १ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १०.३०वाजता पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील शासकीय अधिकाऱ्यांची तहसील कार्यालय मंगळवेढा येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने मध्ये सध्या ३३ हजार ६०० पात्र महिलांची नोंदणी पूर्ण झाली आहे. या योजनेच्या प्रचार आणि प्रसारासाठी व सदर योजनेत जास्तीत-जास्त पात्र महिला भगिनींना समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश आमदार आवताडे यावेळी दिले.
सदरप्रसंगी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर, प्रांताधिकारी बी.आर.माळी तहसीलदार मदन जाधव, गटविकास अधिकारी योगेश कदम, नायब तहसीलदार, बालकल्याण विकास अधिकारी, उद्योजक सरोज काझी, न. पा. प्राथ. शिक्षण मंडळ सदस्य दिगंबर यादव यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते...!
Post a Comment
0 Comments