मंगळवेढा/संतसूर्य वृत्तसेवा
मंगळवेढा शहरा लगत असलेल्या सांगोला रस्ता ते बोराले रस्ता या भागातील क्षेत्राला संत कान्होपात्रा नगर म्हणून महसूल गाव अशी जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर दत्ता माळी यांनी दिली आहे त्यांना जिल्हाधिकाऱ्यांकडून कार्यालयाकडून तसे पत्र उपलब्ध झाले आहे मंगळवेढा शहरालगत यापूर्वी संत चोखामेळा नगर संतदामाजी नगर या दोन ग्रामपंचायती अस्तित्वात आल्या मंगळवेढा शहराच्या एका बाजूला असलेल्या सांगोला रस्ता ते बोराळे रस्ता या भागाला ना महसूल , ग्रामपंचायत गाव ना नगरपालिका असा कोणताच मार्ग राहिलेला नव्हता यामुळे जन्माचा दाखला, मृत्यूचा दाखला आदी सर्व प्रशासकीय कामासाठी नागरिकांना अडचणी येत होत्या अखेर या भागातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे व डॉक्टर दत्ता माळी यांनी केलेल्या प्रयत्न करा अखेर यश मिळाले असून या ठिकाणी आता संत कान्होपात्रा नगर ग्रामपंचायत अस्तित्वात घेण्यास मार्ग सुकर झाला आहे
Post a Comment
0 Comments