मंगळवेढा/ विक्रांत पंडित
पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार समाधान दादा अवताडे हे येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये राज्यमंत्री होणार असून त्यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळणार आहे चालू अधिवेशनामध्ये त्यांनी विधिमंडळ सभागृहामध्ये तालिका समितीचे सभापती पद यशस्वीरित्या सांभाळली आहे. भारतीय जनता पक्ष सत्तेमध्ये येण्यासाठी पंढरपूरच्या पोटनिवडणुकीमध्ये आमदार समाधाना अवताडे यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली किल्ल्याच्या राजकारणात अवताडे ची भूमिका नेहमी महत्त्वपूर्ण ठरली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक भाजप नेत्यांच्या ते मार्गदर्शनाखाली काम करत आहेत भारतीय जनता पक्षासाठी त्यांनी चांगले काम केले आहे नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात 45000 मताचे मताधिक्य प्रणिती शिंदे यांना मिळाले असले तरी या निवडणुकीत नरेटिव्ह प्रचार विरोधकांनी मोठ्या प्रमाणात केला होता मात्र या सर्व परिस्थितीत येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख सुभाष देशमुख यांना जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्याऐवजी नव्या तरुणांना वाव नव्या रक्ताला वाव म्हणून भारतीय जनता पक्षाकडून समाधान दादा अवताडे यांना मंत्रीपद व पालकमंत्री पद देऊ केले जाणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्राकडून समजले आहे. माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या नंतर मंगळवेढ्याला दुसरी वेळ तर पंढरपूरला प्रथमच मंत्रीपद मिळणार आहे गेल्या दोन अडीच वर्षात पंढरपूर व मंगळवेढा मतदारसंघात सुमारे दोन ते अडीच हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे सर्वाधिक निधी आणणारा आमदार म्हणून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा लौकिक निर्माण झालेला आहे चालू अधिवेशनामध्ये युती सरकारने आणलेल्या अनेक योजना लाडली बहीण शेतकऱ्यांचे वीज बिल माफ या सर्व परिस्थितीमुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आमदार अवताडे यांचा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार म्हणून विजय निश्चित मानला जाऊ लागला आहे असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे
Post a Comment
0 Comments