मंगळवेढा/संतसूर्य वृत्तसेवा
शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढा यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या वृक्ष महोत्सव-२०२४ अंतर्गत दहा हजार झाडांचे वृक्षारोपण या पर्यावरण पूरक कार्याचा शुभारंभ पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय पाणीदार आमदार मा.श्री.समाधान दादा आवताडे यांच्या हस्ते मंगळवेढा येथील कृष्ण तलाव परिसरात वृक्षारोपण करून करण्यात आला.
संतभूमी म्हणून परिचय असलेल्या मंगळवेढा भूमीला वृक्षभूमी असा पर्यावरणीय संदर्भ देण्यासाठी संस्थेच्या सचिवा डॉ.सौ.प्रियदर्शनीताई कदम-महाडिक मॅडम यांनी हाती घेतलेले हे अभियान पोषक पर्यावरणाचे मोठे द्योतक आहे. सदर अभियान लोक जागृतीच्या माध्यमातून गतिमान करण्यासाठी आपण सर्वांनी उत्स्फूर्तपणे वृक्षारोपण करून जास्तीत-जास्त झाडांची निर्मिती करूया असे आवाहन आमदार महोदय यांनी यावेळी केले.
यावेळी तहसीलदार श्री.मदन जाधव सो, गटविकास अधिकारी श्री.योगेश कदम सो, धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा.श्री.शिवाजीराव काळुंगे सर, सुप्रसिद्ध मराठी अभिनेते श्री.अजय तपकिरे, संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.डॉ.श्री.सुभाष कदम सर, माजी प्राचार्य प्रा.श्री.श्रीधर भोसले सर, संस्था प्रशासक प्रा.डॉ.सौ.मिनाक्षीताई कदम मॅडम अध्यक्ष श्री.सुजित बापू कदम, उद्योजक श्री.पवन महाडिक, संचालिका प्रा.सौ.तेजस्विनी ताई कदम मॅडम, संपादक श्री.दिगंबर बापू भगरे, जिल्हा लेबर फेडरेशन काम वाटप समिती अध्यक्ष श्री.शाम आण्णा पवार, सरपंच श्री.शिवाजी भाऊ सरगर, माजी नगरसेवक श्री.कैलास दादा कोळी मेंबर, युवक नेते श्री.आनंद मुढे मेंबर, सार्वजनिक शिवजयंती मंडळाचे माजी अध्यक्ष श्री.माऊली कोंडूभैरी, वारी परिवाराचे संस्थापक श्री.सतीश दत्तू,श्री.दत्तात्रय भोसले, उद्योजक श्री.सुरेश मेटकरी आदी मान्यवर तसेच प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी व स्थानिक नागरिक, पर्यावरण प्रेमी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते...💐
Post a Comment
0 Comments