मंगळवेढा बसस्थानक आवारामध्ये २ कोटी २८ लाखांच्या कामांचे आ.अवताडे यांनी केले भूमिपूजन
मंगळवेढा/ संतसूर्य वृत्तसेवा
नागरिकांच्या प्रवासाची सोय सुलभ व्हावी म्हणून अत्याधुनिक बस स्थानकांच्या निर्मिती अनुषंगाने मतदारसंघातील मंगळवेढा बस स्थानकाच्या आवारातील काँक्रिटीकरणाच्या व इतर सुधारणा विकास कामांसाठी आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांतून २ कोटी २८ लाख इतका निधी मंजूर झाला आहे. महाराष्ट्र शासन एसटी स्टॅन्ड धोरणात्मक विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत आमदार अवताडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना अजित दादा पवार तसेच पालकमंत्री ना.चंद्रकांत दादा पाटील व राज्याचे उद्योग मंत्री ना.उदय सामंत यांच्याकडे या निधीच्या मंजुरीसाठी वेळोवेळी पाठपुरावा सुरू ठेवला होता. सर्व नियोजित या विकास कामांचे भूमिपूजन आमदार आवताडे हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले.
मतदारसंघातील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मूलभूत आणि पायाभूत सुविधांचे काम सुरू असून लवकरच ती सर्व कामे जनसेवेत दाखल होती. मतदारसंघाला विकासाच्या एका नव्या शिखरावर नेण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत अशी ग्वाही आमदार आवताडे यांनी यावेळी बोलताना दिली आहे.
सदर नियोजित विकास कामे तात्काळ सुरू करण्याचे निर्देश आमदार आवताडे यांनी संबंधित विभागाला दिले आहेत. तसेच एसटी महामंडळातील चालक, वाहक व इतर कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत, बस स्थानक निधी, ज्यादा बसेस मिळणे या विषयाबाबत आमदार आवताडे यांनी तालुका परिवहन महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून यावेळी आढावा घेतला.
या कार्यक्रमासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर, भाजपा विधानसभा अध्यक्ष राजेंद्र सुरवसे, भाजपा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, चंद्रकांत पडवळे, आगार प्रमुख भोसले कैलास कोळी सुदर्शन यादव, नागेश डोंगरे, सरपंच शिवाजी सरगर, युवराज शिंदे, डी. सी.जाधव, नंदकुमार जाधव, संजय माळी, सचिन गोवे, सुशांत हजारे आदी मान्यवर तसेच एसटी महामंडळ परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकारी, स्थानिक नागरिक उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments