विजापूर ते पंढरपूर नव्हे
यशवंतपूर-पंढरपूर रेल्वेची नियमित सेवा ,:
रेल्वे मंत्र्यांचे आश्वासन
विजापूर ते पंढरपूर रेल्वे सेवा करण्यासाठी खा.प्रणिती शिंदे यांचा प्रयत्नाला अपयश
मंगळवेढा/संतसूर्य वृत्तसेवा
आषाढी वारीला प्रारंभ होत असल्याने यशवंतपूर-पंढरपूर एक्स्प्रेस रेल्वे (क्र. 16541) या एक्स्प्रेस रेल्वेची सेवा 25 जून ते 30 जुलै या कालावधीत दररोज सुरू ठेवावी, या खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांच्या मागणीला केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे बेळगाव आणि उत्तर कर्नाटकातील माऊली भक्तांना पंढरपूरला जाणे सोयीचे होणार आहे.
येत्या दोन दिवसात आषाढी वारीला सुरुवात होत आहे. पुढील महिन्यात पंढरपूर येथे आषाढी एकादशी सोहळा पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने भावीक कर्नाटकातून पंढरपूरला जात असल्यामुळे खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी नवी दिल्लीत रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना उपरोक्त रेल्वे सेवेच्या मागणीचे निवेदन दिले. यशवंतपूर-पंढरपूर ही एक्सप्रेस रेल्वे 25 जून ते 30 जुलै या कालावधीत दररोज धावल्यास मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांची चांगली सोय होणार आहे.
त्यामुळे ही एक्सप्रेस रेल्वे सेवा नियमित करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची विनंती खासदारांनी केली. त्यावर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी तात्काळ यशवंतपूर-पंढरपूर रेल्वे सेवा दररोज कार्यरत ठेवली जाईल असे सांगितले. जर ही रेल्वे सेवा नियमित चालवता येत नसेल तर खास रेल्वेची व्यवस्था केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
मंत्र्यांच्या या आश्वासनामुळे आता पंढरपूरला जाणे विठ्ठल भक्तांसाठी सोय होणार आहे. वारकरी परंपरेतील लोकांच्यावतीने निट्टूर येथील रमेश नार्वेकर आणि खानापूरचे शांताराम गंगाराम हेब्बाळकर यांनी हुबळी ते पंढरपूर रेल्वे सेवा सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन खासदार कागेरी यांना दिले होते. त्या अनुषंगाने खासदारांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे मागणी केली.
दरम्यान, नैऋत्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बेळगाव सीमाभागातून पंढरपूरला जाणारी आषाढी कार्तिकी विशेष रेल्वे सेवा 22 जुलैपासून सुरू होण्याची शक्यता आहे.
रेल्वे सूत्राने दिलेल्या माहितीनुसार हुबळी येथून सकाळी 8 वाजता सुटणारी सदर विशेष रेल्वे 11 वाजता बेळगावला आणि तेथून पुढे पंढरपूरला रवाना होईल. त्यानंतर तिचा परतीचा प्रवास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 12 ते 22 जुलै दरम्यान ही रेल्वे सेवा सुरू होण्याची शक्यता रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
Post a Comment
0 Comments