Type Here to Get Search Results !

संतसूर्य

संत दामाजीची दिवाळी २०२४ सणाची साखर दर शुक्रवारी कारखाना साईटवर मिळणार                  
  
मंगळवेढा / संतसूर्य वृत्तसेवा 
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची सभासदांना येणाया दिपावली २०२४ सणाचे निमित्ताने सवलतीचे दराने विक्री केली जाणारी साखर दि २८ जून पासुन पुढे प्रत्येक शुक्रवारी कारखाना साईटवर सकाळी १० ते सायं ५ या वेळेत देण्याचा निर्णय संचालक मंडळ सभेत झाला  असलेची माहिती कारखान्याचे चेअरमन श्री शिवानंद यशवंत पाटील यांनी दिली.
कारखान्याचे अपूर्ण शेअर्स, ऊस बिल अडव्हान्स येणे, बेणे अडव्हान्स येणे, बेसल डोस येणे, ऊस तोडणी वाहतूक येणे तसेच अन्य प्रकारची कारखान्याची येणेबाकी असणाया सभासदांची साखर शासनाच्या धोरणानुसार देता येणार नसलेची माहिती 
प्र.कार्यकारी संचालक श्री रमेश जायभाय यांनी दिली
कारखान्याने ठरवुन दिलेल्या दिवशी कारखाना साईटवरील साखर विक्री केंद्रावर आपले साखर कार्ड नोंद करुन सभासद बंधुनी आपले सोईनुसार वेळेत साखर घेवून जाणेविषयीचे आवाहन व्हाईस चेअरमन श्री तानाजीभाऊ खरात यांनी केले आहे.
सदर प्रसंगी संचालक सर्वश्री मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणूकाका पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिध्द लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर, 
कार्यकारी संचालक श्री रमेश जायभाय उपस्थित होते

Post a Comment

0 Comments