Type Here to Get Search Results !

संतसूर्य

वकिली क्षेत्रात ॲड श्रीराम चौधरी यांनी मोठे नाव करावे:- संजय आवताडे

मंगळवेढा संतसूर्य वृत्तसेवा 
आपल्या वकिली क्षेत्रात ॲड श्रीराम शांताराम चौधरी यांनी खूप मोठे नाव करावे असे मत आवताडे शुगरचे चेअरमन संजय आवताडे यांनी व्यक्त केले ते ॲड श्रीराम चौधरी यांची मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त सरकारी अभियोक्ता (फौजदारी विभाग) पदी निवड झाल्याबद्दल हजारे व कलुबर्मे परिवाराच्या वतीने रायगड निवास येथे आयोजित केलेल्या सत्कार समारंभात बोलत होते सुरवातीस आवताडे शुगरचे चेअरमन संजय आवताडे,माजी नगराध्यक्ष प्रकाश गायकवाड,माजी नगराध्यक्ष युवराज कलुबर्मे,जयदीप रत्नपारखी,अजित जगताप यांच्या हस्ते ॲड श्रीराम चौधरी यांचा सत्कार करण्यात आला 
आवताडे पुढे म्हणाले ॲड चौधरी यांनी आपल्या वडिलांकडून व मामा ॲड धनंजय हजारे यांच्याकडून बाळकडू घेतलेले होते आपला व्यवसाय जरी दुधारी असला तरी अन्याय विरुद्ध आवाज उठवून न्याय मिळवून द्यावा तसेच विशेष सरकारी वकील ॲड उज्वल निकम यांच्यासारखे नाव कमवून आपले आजोळ असणाऱ्या मंगळवेढ्याचा नावलौकिक वाढवावा असे सांगून शुभेच्छा दिल्या 
यावेळी वकील संघाकडून ॲड उल्हास माने,व्यापारी संघाकडून जयदीप रत्नपारखी,वारी परिवाराकडून अजित जगताप,सकल मराठा समाजाकडून विलास आवताडे,सुनील डोके,गणेश पाटील,यांनीही आपले मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या तर ॲड श्रीराम चौधरी यांनी मुंबई उच्च न्यायालयातील अनेक अनभुव सांगून मंगळवेढ्यातील लोंकानी दिलेले प्रेम आयुष्यभर स्मरणात राहील असे सांगून सर्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली सदर कार्यक्रमाप्रसंगी याप्रसंगी प्रभाकर घुले,विठ्ठल गायकवाड,डी एन जाधव,सुनील पाटील,शरद हेंबाडे,अंकुश पडवळे,नितीन सुरवसे,सतिश हजारे,कुमार धनवे,भारत नागणे,सिद्धेश्वर दत्तू,प्रा धनाजी गवळी,ॲड सुजय लवटे,ॲड मनीष मर्दा,ॲड प्रदीप पवार,ॲड डी एस माने,ॲड शिरीष पवार,ॲड सीमा ढावरे,ॲड राणी चौधरी,मुझ्झमील काझी,ज्ञानेश्वर कलुबर्मे,दयानंद पाटील,सतिश दत्तू,अरुण गुंगे,विजय हजारे,प्रा विक्रम पवार,विठ्ठल बिले,प्रफुल्ल सोमदळे,रवी जाधव,प्रा विजय दत्तू,आप्पासाहेब हजारे,वैभव हजारे,युवराज हजारे,सम्राट हजारे,ओम कलुबर्मे यांच्यासह वारी परिवार,वकील संघ,रविवार परिवार,सकल मराठा समाज,हजारे,कलुबर्मे,चौधरी परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा विनायक कलुबर्मे यांनी केले तर ॲड धनंजय हजारे यांनी आभार मानले

Post a Comment

0 Comments