मंगळवेढा/ विक्रांत पंडित
सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीत सर्वसामान्य जनतेने आशीर्वाद दिले खोमनालच्या कांबळे काकांनी 501 रुपये चे पाकीट दिले ते पाकीट मी देव्हाऱ्यात ठेवले आहे. जनतेची श्रद्धा पाठीशी आहे पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील विधानसभेच्या निवडणुकीसाठी आता भगीरथदादा तुम्ही कामाला लागा या शब्दात खासदार प्रणितीताई शिंदे यांनी भगीरथ भालके यांना कृतज्ञता मेळाव्यात भावी आमदार म्हणून घोषित केले. व्यासपीठावर सुशीलकुमार शिंदे, उज्वला शिंदे, उत्तम जानकर,मंगळवेढा तालुक्याचे नेते बबनराव आवताडे,राहुल शहा, चेतन नरोटे यांच्या सह पन्नास नेते व्यासपीठावर उपस्थित होते
नवनिर्वाचित खासदार प्रणितीताई शिंदे यांनी ग्रामपंचायत सदस्य प्रमाणे या मतदारसंघात काम करणार असल्याचे सांगितले स्वतः प्रत्येकाच्या घरी जाऊन जनतेचे प्रश्न समजून घेऊन सोडणार आहे 405 चा नारा देणारे खुद्द अयोध्येत पराभूत झाले. सर्वसामान्य जनतेची ताकद भाजपच्या इडी सीबीआय इन्कम टॅक्स या ताकतीला भिली नाही. माझ्या आई-वडिलांचा पराभव झाल्यानंतर तुम्ही स्वतः निवडणूक हातात घेऊन मला विजय केले याचे श्रेय तुम्हाला हे हे श्रेय वाया जाऊ देणार नाही . मराठा आरक्षणाचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणार आहे.लोकसभेचे अधिवेशन संपल्यानंतर मतदार संघात पुन्हा कार्यरत राहणार आहे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवणार आहे.
भावी आमदार भगीरथ दादा यावेळी बोलताना म्हणाले स्वर्गीय नानांनी या तालुक्यात 35 गाव पाणी योजना कागदावर आणली मंजूर करून आणली परंतु महा विकास आघाडीने यासाठी निधी देण्याचा प्रयत्न केला असताना महायुती सरकारने पाणी कमी केले प्रत्यक्षात पाणी दिले नाही यामुळे दुष्काळी 35 गावातील जनता महायुतीला कधीच माफ करणार नाही हे या निवडणुकीत परत एकदा दिसून आले आहे मोहोळ पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून आम्ही सर्वाधिक लीड दिले आहे 51 हजाराचे मताधिक्य देऊन ताईंना विजयी केले आहे यामुळे ताई या मतदारसंघाचे प्रश्न मोठी ताकद लावून सोडवणार आहेत.
जोपर्यंत मंगळवेढा तालुक्यात जिल्ह्याचे नेते बबनराव अवताडे यांचे राजकारण सामाजिक कार्य चालू आहे तोपर्यंत या तालुक्यात कोणाचीही दादागिरी चालू दिली जाणार नाही या शब्दात युवक नेते सिद्धेश्वर अवताडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
खासदार प्रणिती ताई शिंदे यांचे पर्जन्य राजाने स्वागत केले कोणतेही वाहन नसताना मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य जनता ग्रामीण भागातील कार्यकर्ते अप्पाश्री लॉन मध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments