Type Here to Get Search Results !

संतसूर्य

 अवकाळी पावसाच्या माध्यमातून समाधान आवताडे , प्रशांत परिचारक ,अभिजीत पाटील, भगीरथ भालके यांनी लावली  विधानसभेसाठी फिल्डिंग

मंगळवेढा / संतसूर्य वृत्तसेवा 

मंगळवेढा तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे केळीच्या बागा आंब्याच्या बागा इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर वादळामुळे घरे पडले असून पत्रे उडाले आहेत वित्तहानी झाली आहे या परिस्थितीत आमदार समाधान दादा अवताडे माजी आमदार प्रशांत परिचारक विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील तेलंगणा राष्ट्र समितीचे भगीरथ भालके या सर्वांनी या अवकाळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना भेटून नुकसान झालेल्या जनतेला भेटून त्यांचे सांत्वन केले आहे शासनाकडून मदत मिळवून देत असल्याचे आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले त्याच पद्धतीने माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी देखील सांगून सांत्वन केले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बाधित नागरिकांना मदत करावी अशी मागणी अभिजीत पाटील यांनी फडणवीस यांची भेट घेऊन केली आहे तर भगीरथ भालके डॉक्टर प्रणिता भालके यांनी देखील बाधित नागरिकांना भेट देऊन त्यांना धीर दण्याचे काम केले आहे
नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी आजी-माजी भावी आमदारांनी आत्तापासूनच विव्हरचना राबवण्यास सुरुवात केली आहे. पोटनिवडणुकी मध्ये आमदार समाधान आवताडे यांनी विजय मिळवला त्यांनी मतदारसंघात संपर्क ठेवून 1700 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला अनेक वर्षे प्रलंबित असलेली 35 गाव पाणी योजनेला मंजुरी आणून निविदा प्रकाशित केली अनुदान मिळवले याशिवाय निंबोणी येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर करून आणले मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा आणला मान नदीमध्ये कृष्णा नदीचे पाणी आणून दिले अनेक न होणाऱ्या योजना मार्गी लावल्या परंतु हो पाहणारे संत चोखामेळा महात्मा बसवेश्वर यांची स्मारक ही कामे प्रलंबित राहिली पंढरपूर विजापूर सांगोला सोलापूर हे लोहमार्ग करण्यात त्यांना अद्याप यश आले नाही राजकीय कमान उंचावत गेली राजकीय प्रतिष्ठा उंचावत गेली प्रशासनातील अनुभव चांगला येत गेला परंतु त्यांना राजकारणामध्ये समोर आडवी आलेली सांगविचारी आघाडी दामाजी कारखान्याचे अपयश यातून बाहेर पडणे थोडे कठीण होत चालले आहे नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत समविचारी आघाडीने त्यांचा अभिमन्यू केला आहे आता अभिमन्यू झाला आहे की नाही हे मात्र 4 जूनला स्पष्ट होणार आहे      
आगामी विधानसभा निवडणूक ते लढवणार असल्याचे स्पष्ट आहे पक्षाची उमेदवारी त्यांना गृहीत धरली जात आहे पक्षातील वजन व त्यांची कुवत क्षमता पाहता त्यांना उमेदवारी चिन्ह आज मिळणार असल्याचे ठाम सांगितले जात आहे दरम्यान प्रशांत परिचारक यांनी करार संपला आहे असे एक जानेवारीला स्पष्ट केले लोकसभेचे निवडणुकीचे मतदान संपतात मतदारसंघात संपर्क वाढवला आहे आरपारची लढाई म्हणून त्यांच्याकडून सांगितले जात आहे त्यांचे कार्यकर्ते निवडणूक लढवण्यासाठी ठाम आहेत कमळाचे चिन्ह न मिळाल्यास शरद पवारांची तुतारी घेण्याची तयारी त्यांच्या समर्थकांनी तयार ठेवली आहे शरद पवारांचा आशीर्वाद असल्यास आमदारकी दूर नाही असे सांगविचारी आघाडीला वाटत आहे राजकीय अनुभव पाहता राजकीय कुवत क्षमता पाहता उमेदवारी म्हणून देखील परिचारक प्रबळ दिसत आहेत परंतु अंतिम क्षणी निवडणूक लढवणार की नाही याबद्दल सामान्य नागरिकात विनाकारण गैरसमज करून दिला जात आहे.
विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील हे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे यापूर्वीच त्यांनी स्पष्ट केले आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक लढवणार होते परंतु आता ते भाजपच्या संपर्कात आले असल्यामुळे भाजपची उमेदवारी मिळणर की बंडखोरी करून अपक्ष लढणार की शरद पवार यांच्या गटात परत जाणार की वेळ प्रसंगी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून लढणार असे अनेक तर्क सांगितले जात आहेत मात्र निवडणूक लढवण्यासाठी स्वर्गीय आमदार भारत भालके यांच्यानंतर त्यांचा वारसा चालवण्याची क्षमता मात्र अभिजीत आबा पाटील यांच्याकडे असल्याचे विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीत तर दिसलेच परंतु पुढील राजकारणामध्ये त्यांच्या आक्रमक शैली डावपेच पाहता ते नवे भारत 
भालके होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भगीरथ भालके हे येणारी विधानसभेची निवडणूक आरपारची लढाई म्हणून लढणार आहेत यामुळे त्यांनी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सोडली तेलंगणाचा राष्ट्र समिती पक्ष निवडला आजही ते काँग्रेस पक्षाबरोबर आहेत भविष्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर असतील असे सांगितले जात असले तरी भगीरथ भालके यांचा पक्ष म्हणजे जनता पक्ष हे धोरण त्यांनी ठेवलेले आहे जनता जो म्हणेल तो पक्ष भालके यांचा असणार आहे भालके यांना पंढरपूर व मंगळवेढा दोन्ही गटातून चांगला प्रतिसाद आहे परंतु भालके कार्यकर्त्याला वेळ देऊ शकत नाही तर जनतेला वेळ कधी देणार असा प्रश्न त्यांचे राजकीय विरोधक उभा करत आहेत एकूणच आजमीतीस चौरंगी लढत अटळ असल्याचे दिसत आहे यामुळे अवकाळीत केलेल्या भेटीगाठी ,अवकाळीत दिलेली मदत विधानसभेच्या निवडणुकीत कोणाला उपयोगी ठरणार हे आत्तापासूनच नागरिक चर्चा करत आहेत.

Post a Comment

0 Comments