काँग्रेसचे आमदार तथा लोकसभा उमेदवार प्रणिती शिंदे यांना मोदी आणि विकासाची कावीळ झालेली आहे त्यामुळे त्यांना एवढा विकास होऊन देखील विकास नाही हे म्हणावे लागत आहे एखाद्या व्यक्तीला कावीळ झाल्यानंतर सगळं काही पिवळं दिसायला लागतं तशा पद्धतीचं काँग्रेस वाल्यांचं झालेलं आहे ज्या रस्त्यावरून ते येतात ज्या योजनांचा लाभ त्यांचे कार्यकर्ते देखील घेतात ते सर्व काही साफ खोटा आहे आणि काहीच विकास झाला नाही असा बोभाटा करायचा आणि समोरच्या व्यक्तींवरती तो लादायचा हे काम प्रीती शिंदे करत असल्याची टीका भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव यांनी केली. पुढे बोलताना ते म्हणाले
" भारतीय जनता पक्षाच्या एका खासदारामुळे देश पातळीवरचे कित्येक निर्णय घेण्याचे सोयीस्कर झालेले आहे . परंतु शिंदे यांनी लक्षात घेतले पाहिजे भाजपचा एक खासदार संसदेत गेला तर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे ताकद वाढली आहे . आमच्या एका खासदारामुळे कलम 370 रद्द झालं 35 A हे रद्द झालं . देशांमध्ये सीएए लागू झालेला आहे . जगभरा मधल्या हिंदूंचा प्रेरणास्थान आराध्य दैवत असणार प्रभू श्री राम मंदिर अयोध्या मध्ये उभारलेला आहे. देश सुरक्षित हातामध्ये असून देशावरती कोणी वाकडी नजर केली तर त्याला सर्जिकल स्ट्राइक न उत्तर मिळू शकतात हे देखील दाखवून दिलेल आहे .आज ग्रामीण भागातल्या प्रत्येक घरापर्यंत जल जीवन मिशनच्या अंतर्गत प्रत्येक वाड्यावस्त्यावरती नळाने पाणी पोहोचलेला आहे . ग्रामीण भागामध्ये असो वा शहरी भागांमध्ये असो जन सुविधा केंद्र उघडण्यात आलेले आहेत , आयुष्यमान भारत सारखी योजना की ज्यामध्ये पाच लाख रुपये पर्यंतचा विमा असून आज कोट्यावधी लोकांचे मोफत ऑपरेशन त्या माध्यमातून झालेले आहेत . शिंदे यांनी त्यांच्या मतदारसंघांमध्ये देखील लोकांच्या ऑपरेशन आयुष्यमान भारतच्या माध्यमातून करून दिले असतीलच याची देखील जाणीव त्यांनी स्वतः समजून घ्यावी . जनधन योजना काढून आज सामान्यतला सामान्य जनतेचा बँक मधील खाते काढून देण्याचे काम केलेला आहे .डिजिटल इंडिया च्या माध्यमातून सर्वजण मोबाईल वरून पैसे ट्रान्सफर करत आहेत हे देखील भारतीय जनता पक्षाचे काम आहे . स्किल इंडियाच्या अंतर्गत लाखो तरुणांना कोणत्या ना कोणत्या शाखेचे प्रशिक्षण मिळवून ते रोजगाराला लागलेले आहेत . किसान सन्मान निधी जो की वर्षाला सहा हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याला मिळतो , आज काँग्रेसचे कित्येक कार्यकर्ते देखील त्याचा लाभ घेतात हे देखील मी त्यांना सांगू इच्छितो . त्यासोबतच आज गोरगरीब कुटुंबांना कुटुंबांना मोफत रेशन मिळतं , प्रधानमंत्री स्वनिधी योजना की जे फळगाडे असतील भाजीपाला विकणारे असतील त्यांच्याकरता ही योजना आहे . प्रधानमंत्री सौभाग्य योजना अंतर्गत लाईट दिलेली आहे . प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना प्रत्येक माता माऊली ना गॅस देण्याचे काम केलेला आहे . श्रमयोगी मानधन योजना आहे . आज सर्व ठिकाणी स्वच्छता आपल्याला दिसते ती देखील पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी स्वच्छ भारत मिशन ने केलं आहे .घरोघरी शौचालय ही देखील योजना भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आलेले आहेव आज प्रत्येक घरात शौचालय आहे . त्यासोबतच प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून करोडो लोकांचे घराचे स्वप्न आज पूर्ण झालेली आहेत आणि हे सगळं आमच्या एका खासदारामुळे झालेला आहे . त्यासोबत प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आज कोट्यावधी रुपयांचे महामार्ग आपल्याला दिसतात , ताई तुम्ही ज्या महामार्गाने येता ज्या महामार्गाने तुम्ही प्रवास करता ते महामार्ग सुद्धा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि आमच्या खासदाराच्या माध्यमातून झालेली आहे हे मी तुम्हाला सांगू इच्छितो . सोलापूर मधील वंदे भारत रेल्वे असेल हे देखील खासदाराच्या माध्यमातून झालेली आहे . आमचा एक खासदार एवढ्या सगळ्या योजना मिळवून देण्याकरता उपयुक्त ठरतो त्यामुळे अशी एक नाही तर कित्येक योजना आपल्याला दिसत आहे पण खरंतर तुम्हाला कावीळ झालेली आहे त्यामुळे तुम्हाला विकास दिसणार कसा ? काँग्रेसने गेल्या 70 वर्षांमध्ये जे केलं नाही ते दहा वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीने करून दाखवलेला आहे आणि हे तुम्हाला पचत नसल्यामुळे तुम्ही लोकांची दिशाभूल करत आहात . मंगळवेढा शहर व तालुक्यातील गावांना देखील कोट्यावधीचा निधी भारतीय जनता पार्टी चे खासदार व आमदार यांनी मिळवून दिला आहे . आणि हा विकास तुम्हाला दाखवून जनता देखील तुमची कावीळ दूर केल्याशिवाय राहणार नाही . "
अशा पद्धतीचं मत त्यांनी यावेळी व्यक्त करत परंतु शिंदे यांच्यावरती टीका केली.
Post a Comment
0 Comments