मंगळवेढा / विक्रांत पंडित
माढा लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टीचे उमेदवार म्हणून माजी खासदार माजी मुख्यमंत्री पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दुपारी हातात घेणार आहेत .उद्या बुधवारी दुपारी चारच्या सुमारास ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी घेऊन माढा लोकसभा मतदारसंघ लढण्याचे तयारीत आहेत यांची उमेदवारी आता निश्चित मानली जात आहे .भारतीय जनता पक्षाने यापूर्वीच विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी घोषित केली आहे. निंबाळकर यांना उमेदवारी देऊ नये म्हणून मोहिते पाटील व रामराजे निंबाळकर संजीव राजे निंबाळकर यांनी जोरदार प्रयत्न केले होते परंतु त्यांच्या प्रयत्नाला यश आले नाही भाजपचे संकट मोचक गिरीश महाजन यांनी देखील प्रयत्न केले परंतु भाजपाकडून उमेदवारी बदलली गेली नसल्यामुळे मोहिते पाटील काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते .धैर्यशील मोहिते पाटील यांनी निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. बाळ दादांनी शरद पवारांची तुतारी हातात घ्यावी असे जाहीर स्पष्ट केले होते .त्यानंतर 48 तास वातावरण शांत झाले समजून झाल्यानंतर परत एकदा मोहिते पाटील गटाने उचल खाली असून आता बुधवारी चार वाजता विजयसिंह मोहिते पाटील माढा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत आले आहेत. त्यामुळे माड्यातली निवडणूक परत एकदा माजी खासदार विरुद्ध विद्यमान खासदार यांच्यात रंगतदार होणार असल्याची चिन्हे स्पष्ट होऊ लागली आहे.
विजयदादा नी तुतारी हातात घेतल्यास सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये परिणाम होण्याची शक्यता असून प्रणिती शिंदे यांना अधिक लाभ होईल.
Post a Comment
0 Comments