मंगळवेढा/ विक्रांत पंडित
हुन्नूर येथील भगवान माने यांच्या जर्सी प्रजातीच्या ३ गाईंनी एरंड्या झाडाच्या बिया खाल्याने विषबाधा होऊन त्या मृत्युमुखी पडल्या. सदर घटनेची माहिती समजल्यानंतर पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी माने परिवाराची भेट घेऊन सांत्वन केले व मानसिक धीर दिला.
तालुक्यातील बहुतांश कुटुंबांच्या अर्थप्राप्तीचे जोड माध्यम असणाऱ्या दुग्धव्यावसायिकांवर अशा घटनांनी अस्मानी संकटाची कुऱ्हाड कोसळणे आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते होणे ही बाब मनाला खोलवर वेदना देणारी असल्याचे भावनिक उद्गगार आमदार आवताडे यांनी व्यक्त केले.
यावेळी भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, युवक नेते तानाजी काकडे, माजी सरपंच दत्तात्रय माने, उद्योजक पिनूभाऊ आवताडे आदीजण तसेच माने परिवारातील भगिनी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments