Type Here to Get Search Results !

संतसूर्य

धनश्री परिवाराची आणखी एक उंच भरारी


मंगळवेढा/विक्रांत पंडित 

धनश्री परिवाराने धनश्री महिला पतसंस्था, धनश्री मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी, सिताराम शुगर, सिताराम क्रेडिट सोसायटी अशा अनेक संस्था उभे केल्या. या आर्थिक यशा पाठोपाठ धनश्री परिवाराने आता मोहोळ तालुक्यातील आष्टी येथील आणखी एक शुगर फॅक्टरी आपल्या परिवारात सामील करून घेतली आहे. यामुळे धनश्री परिवार परत एकदा सोलापूर जिल्ह्यात अग्रगण्य आदर्श परिवार म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. मंगळवेढा तालुक्यात धनश्री परिवाराने आर्थिक क्षेत्रात क्रांतीकारक कामगिरी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या कृषी मूल्य जीवनात भर टाकण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सहकार्य करण्यासाठी दोन साखर कारखाने सुरू करून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना चांगली मदत करण्यास सुरुवात केली आहे. सिताराम साखर कारखाना हा बंद अवस्थेत होता त्याला ऊर्जेत अवस्थेत आणले केवळ ऊर्जेत अवस्थेत आणले असे नव्हे तर त्या कारखान्यात अमुलाग्र बदल करत कारखाना सुस्थितीत आणला आहे. या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात सोय केली असून कोणत्याही ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे बिल थकीत राहिलेले नाही. विश्वासाने काम केल्यामुळे ऊस उत्पादकात विश्वासार्हता निर्माण झालेली आहे. मुळात काळुंगे  परिवार ,धनश्री परिवार यांनी आपल्या कामाने सभासदाचा ग्राहकाचा विश्वास मिळवणे यामध्ये अधिक आनंद आहे. या विश्वासाने त्यांनी हा आपला परिवार जिल्ह्यामध्ये नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात अग्रगण्य बनवण्याचे काम सुरू केले आहे . आर्थिक अडचणीत असलेल्या कारखान्यांना केंद्र शासन राज्य शासन मदत करते महाराष्ट्र सहकारी बँक मदत करते परंतु यापेक्षा अधिक अडचणीत सापडलेल्या संपूर्ण काळात गेलेल्या कारखान्याला कोणीच मदत करत नाही अशा 100% अडचणीत सापडलेल्या कारखान्यांना त्या भागातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी धनश्री परिवााराने घेतलेली भूमिका व त्यातून मिळालेला प्रतिसा यामुळे धनश्री परिवार हा केवळ केवळ शेतकऱ्यांसाठी सहकार्य करणारा परिवार म्हणून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात ओळखला जात आहे आज सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारी धनश्री परिवाराच्या मदतीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. संत दामाजी साखर कारखाना केवळ आणि केवळ धनश्री परिवाराने हात दिल्यामुळे मोठा अवस्थेत असलेल्या कारखाना आता जीवन चांगला जिवंत झाला आहे कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील यांनी दिली आहेत कामगारांचा पगार दिला आहे हंगामी कर्मचाऱ्यांच्या रिटेन्शन अलाउंस देखील दिला आहे ही सर्व किमया चेअरमन शिवानंद पाटील, तानाजी खरात व त्यांच्या सहकाऱ्यांनी केवळ पांडुरंग परिवाराचे नेते प्रशांत परिचारक धनश्री परिवाराचे प्रमुख शिवाजीराव काळंगे व इतरांच्या सहकार्याने केली आहे मंगळवेढा तालुक्यातील धनश्री परिवार सोलापूर जिल्ह्याच्या बाहेर अटकेपार झेंडे लावू लागला आहे सांगली जिल्ह्यात देखील परिवाराने चांगले काम उभे केले आहे. आता मोहोळ तालुक्यातील आष्टीतील साखर कारखाना परिवाराने आपल्या सामील करून घेऊन या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची चांगली सोय करण्याचा निर्णय घेतला आहे.. धनश्री परिवारामध्ये प्रमुख शिवाजीराव काळुंगे यांना संपूर्ण सहकार्य करणाऱ्या शोभाताई काळुंगे, डॉक्टर राजलक्ष्मी गायकवाड या सर्वांच्या अचूक नियोजनामुळे व परिवारातील सहकाऱ्यांच्या सहकार्यामुळे धनश्री परिवार हा शेतकऱ्यांचा आपला परिवार होऊ लागला आहे.

Post a Comment

0 Comments