खोमनाळ येथील पदवीधर शिक्षक श्री कांताराम बाबर आदर्श शिक्षक पुरस्कारांने सन्मानित
जि. प. शाळा खोमनाळ पदवीधर शिक्षक श्री कांताराम तात्या बाबर यांना नुकतेच मंगळवेढा पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री समाधान आवताडे यांच्या शुभहस्ते पंचायत समिती मंगळवेढा शिक्षण विभागाच्या वतीने सन २०२३-२०२४चा आदर्श शिक्षक पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर,नवनाथ मोरे महाराज, गटशिक्षणाधिकारी पोपट लवटे, विस्तार अधिकारी डॉ बिभिषण रणदिवे, आनंदपुरे.शिवसेना तालुकाप्रमुख येताळा भगत सर, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक शिक्षक, शिक्षिका व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी श्री कांताराम बाबर यांनी खोमनाळ शाळेत राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली, सायकल बॅक, स्वच्छ शाळा सुंदर शाळा, परसबाग, जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, लेझीम नृत्य सादर करणे, तसेच विविध उपक्रमांची अंमलबजावणी, विविध स्पर्धांचे आयोजन करणे, विविध शिष्यवृत्ती परीक्षा, यामध्ये विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे...या पुरस्कारांबद्दल सरपंच सौ बायडाताई राजेंद्र मदणे, उपसरपंच श्री संतोष कलुबर्मे, सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य,माजी सरपंच व उपसरपंच,व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री बाबासाहेब बिले , उपाध्यक्षा सौ अयोध्या युवराज शिंदे यांनी या पुरस्कारांबद्दल श्री कांताराम बाबर सरांचे अभिनंदन केले .
Post a Comment
0 Comments