सोलापूर लोकसभेसाठी भारतीय जनता पक्षाकडून आमदार राम सातपुते यांना उमेदवारी मिळणार
मंगळवेढा/विक्रांत पंडित
मंगळवेढा सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून माळशिरसचे विद्यमान आमदार राम सातपुते यांना संधी मिळणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी यादी जाहीर होताच त्यामध्ये राम सातपुते यांचे नाव सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी येईल अशी माहिती सूत्राकडून मिळत आहे. यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांची लढत महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्यात होणार असल्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत .भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी महाराज यांचा जातीचा दाखला वादग्रस्त बोगस निघाला असल्यामुळे भारतीय जनता पक्षाकडून त्यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता सुतराम राहिली नाही .अशा परिस्थितीत माध्यमातून, राजकीय नेते व कार्यकर्त्यातून आमदार प्रणिती शिंदे भाजपमध्ये येऊन लोकसभेची निवडणूक लढवतील असे सांगितले जात होते. प्रणिती शिंदे यांना राजकीय करिअर करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे उमेदवारी घेऊन खासदार होणे .देशाच्या राजकारणात सहभागी होऊन आपली राजकीय उंची वाढवणे सोयीचे होते. भाजपाला दलित चेहरा सुशिक्षित महिला अशा उमेदवाराची अपेक्षा देखील होती. देशात भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हवा आहे ,गॅरंटी आहे .यामुळे प्रणिती शिंदे समर्थकांना देखील त्यांनी भाजपकडून उमेदवारी घेऊन चालू राजकीय परिस्थितीत मतदार संघाचा व स्वतःचा राजकीय फायदा करून घेऊन सोलापूर जिल्ह्याला विकास कामात भारतीय जनता पक्षाकडून मोठे योगदान मिळवून घ्यावे असे वाटत होते .त्याचवेळी काँग्रेस पक्षाचे भवितव्य संपत आले असून पक्ष विकलांग झाला आहे अशा परिस्थितीत काँग्रेस कडून महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवून जिंकून येण्याची आशा कमी असल्यामुळे शिंदे समर्थकांना प्रणिती शिंदे यांनी भाजपा कडून उमेदवारी घ्यावी असे वाटत होते .भारतीय जनता पक्षाकडून अद्याप उमेदवारी जाहीर केली गेली नसून कोणत्याच नावाची चर्चा होत नसल्यामुळे अनेक राजकीय निरीक्षकांना देखील आमदार प्रणिती शिंदे ऐनवेळी भाजपमध्ये जातील व भाजपाचे उमेदवारी घेतील त्याचवेळी महाविकास आघाडीला उमेदवार सहजासहजी मिळणार नाही असा भाजपचा डाव असेल असे सांगितले जात होते .परंतु राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही कदाचित राजकिय भीतीपोटी शिंदे कुटुंबीयांकडून काँग्रेस सोडली जात नसल्यामुळे प्रणिती शिंदे यांना भाजपा कडून खासदार होण्याची संधी गमवावी लागत आहे. असे भाजप समर्थकांना वाटत आहे.
दरम्यान सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी माजी खासदार अमर साबळे ,माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, कोमल ढोबळे, माजी खासदार शरद बनसोडे आदींच्या नावाची चर्चा केली जात होती परंतु विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना भारतीय जनता पक्षाकडून सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारी देऊ केली जाणार आहे .राम सातपुते हे भाजपाचे खंदे समर्थक असून सच्चा कार्यकर्ता आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. सोलापूर लोकसभेसाठी फडणवीस यांच्याकडून राम सातपुते यांच्या नावाचा आग्रह केला जात असल्याने सातपुते यांचे नाव अंतिम होऊन लवकरच उमेदवारी यादी मध्ये भारतीय जनता पक्षाकडून जाहीर केले जाईल असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
सहा विधानसभा मतदारसंघात प्रणिती शिंदे यांचा मतदारसंघ वगळता पाच ठिकाणी भारतीय जनता पक्ष व युतीचे आमदार आहेत तर प्रणिती शिंदे यांच्या मतदारसंघात माजी आमदार नरसे आडम यांना भारतीय जनता पक्षाने मोठ्या प्रमाणात घरकुल साठी सहकार्य केले असून वीस हजार घरकुले उभा करून दिले असल्यामुळे या ठिकाणी देखील भाजप जनता पक्षाच्या उमेदवाराला चांगले मतदान मिळू शकणार असल्याचा दावा पक्षाच्या कार्यकर्त्यातून केला जात आहे. अक्कलकोट, सोलापूर दोन,मोहोळ, पंढरपूर मंगळवेढा या ठिकाणी भाजपाचे व मित्र पक्षाचे आमदार असल्यामुळे राम सातपुते यांना विजयी होणे अधिक अवघड जाणार नसल्याचे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यातून बोलले जात आहे. दरम्यान आमदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवेढा तालुक्यात सलग आपला दौरा केला असून जनतेचे प्रश्न समजून घेत जनतेशी समरस होत निवडणुकीची तयारी जिंकण्यासाठी सुरू केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पासून विद्यमान खासदार डॉ. जय सिद्धेश्वर स्वामी , पंढरपूर मंगळवेढा चे आमदार समाधान आवताडे यांच्यावर देखील त्यांनी टीका करून जनतेला न्याय मिळाला नसल्याचे आरोप जाहीर सभेतून केले आहेत .काँग्रेसमध्ये जन्मली काँग्रेसमध्येच मरणार असा दावा त्यांनी केला आहे.शिंदे महाविकास आघाडी कडून लढून विजयी होण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे महाविकास आघाडीचे मंगळवेढ्यातील नेते कार्यकर्ते सांगत आहेत. दरम्यान महाविकास आघाडी कडून प्रणिती शिंदे तर महायुती कडून राम सातपुते यांच्यात सरळ लढत होण्याची चिन्हे निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच दिसू लागली आहेत.
Post a Comment
0 Comments