मंगळवेढा/संतसूर्य वृत्तसेवा
मागील दोन खासदारांनी आपल्या पक्षासाठी खासदार फंडातील कामे टक्केवारी वर विकली असे खासदार जनतेला नकोत
सोलापूर चे सुपुत्र सुशीलकुमार शिंदे यांनी कधीच टक्केवारी चे राजकारण केले नाही
माळशिरस विधानसभेची उमेदवारी मिळाल्यावर सदाशिवनगर कारखान्यामध्ये माझ्या आई-वडिलांनी ऊस तोडला अशी बोगस आवई उठवली आणि सोलापूर लोकसभेची उमेदवारी मिळाली की सिद्धेश्वर,दामाजी, आणि विठ्ठल या कारखान्याची नावे सांगितली मग नेमका कोणत्या कारखान्याचा ऊस तोडला असा सवाल काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज माळी यांनी उपस्थित केला.
सोलापूर लोकसभेची उमेदवारी भाजपाकडून आ. राम सातपुते यांना जाहीर झाल्यानंतर त्यांच्या रहिवाशी ठिकाणावरून आरोप प्रत्यारोप सुरू असताना भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष सुदर्शन यादव यांनी माळशिरसचे आमदार असणारे राम सातपुते जिल्ह्यात उपरे कसे असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्या प्रश्नाला उत्तर देत शहराध्यक्ष मनोज माळी म्हणाले की, अख्या बीड जिल्ह्याने ऊस तोडला ऊस तोडणी करणारा मजूर 200 कोटीचा बंगला बांधू शकला नाही पाच वर्षात अशी कोणती किमया साधली झोपडीत राहणारे आ.राम सातपुते आलिशान बंगल्यात कसे आले.सोलापूर लोकसभेसाठी पंधरा दिवसात भाजपला तीन वेळ अनेक उमेदवार इच्छुक असताना तीन-तीन वेळा उमेदवार बदलावा लागला यात हेच त्यांचे सर्वात मोठे अपयश आहे केंद्रात फक्त त्यांना डोके मोजणारे खासदार हवे आहेत म्हणून त्यांनी मतदारसंघ ऐवजी बाहेरच्या मतदारसंघातील उमेदवार दिल्याचा आरोप शहराध्यक्ष माळी यांनी केला एकूणच लोकसभेच्या उमेदवारीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या.
Post a Comment
0 Comments