मंगळवेढा/विक्रांत पंडित
सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष च्या वतीने आमदार प्रणितीताई शिंदे यांना उमेदवारी घोषित झाली असून प्रणितीताई शिंदे यांनी प्रचार देखील सुरू केला आहे. गाठीभेटी घेणे, अडचणी समजून घेणे, स्थानिक पातळीवर नेते कार्यकर्ते यांच्याशी हितगुज करत आपले काम सुरू केले आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनापासून 35 गावच्या पाण्यापर्यंत अनेक ठिकाणी त्यांनी मोठ्या धैर्याने आत्मविश्वासाने सामोरे गेल्यामुळे त्यांच्याबद्दल आपुलकीचे वातावरण निर्माण झाले आहे. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात आमदार प्रणिती शिंदे यांना स्वर्गीय मारवाडी वकील, स्वर्गीय रतिलाल शेठजी, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांची जाणीव नक्की होणार आहे. एकेकाळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा हा मतदारसंघ आता भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला झाला असून पक्ष संघटना कार्यकर्त्यांमध्ये युपीए पेक्षा एनडीए अधिक फॉर्मत आहे अशा परिस्थितीत मंगळवेढा तालुक्यात प्रणिती शिंदे यांचे मतदारसंघ परिवाराचे नेते शिवाजीराव काळुंगे यांच्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे धनश्री च्या माध्यमातून काळुंगे परिवाराने आर्थिक, शैक्षणिक सामाजिक, सांस्कृतिक ,राजकीय ,कृषी आदी सर्व क्षेत्रात मोठे बस्थान बसवले आहे. मंगळवेढ्या सह पंढरपूर क्षेत्रात सुद्धा त्यांचे काम चांगले आहे याचा फायदा प्रणिती शिंदे यांना निश्चित होणार आहे. पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार हे हुकमी एक्का म्हणून प्रणिती शिंदे यांना उपयोगी येणार आहेत. वक्तृत्व ,राजकीय प्रत्युत्तर देण्याची क्षमता, काम करण्याची क्षमता, हॉटेल कामगार संघटना पासून शेतकरी आंदोलनापर्यंत सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रात काम केले असून काढून पवार व काळूंगे दोघेही दामाजी कारखान्याच्या इतिहासात चांगले काम केलेले नेतृत्व म्हणून त्यांचा लौकिक आहे. या दोघा बरोबर दक्षिण भागात धनगर समाजाचे नेते सुरेश कोळेकर यांचा प्रणिती शिंदे यांना निश्चित उपयोग होणार आहे मुळातच कोळेकर हे शिंदे कुटुंबियांचे अनुयायी आहेत सुशील कुमार शिंदे यांच्या प्रत्येक निवडणुकीला कोळेकर यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख असून भाषण न करता गडबड न करता बसून जुळण्या करून कांडका पाडण्यात चरणू काका पाटील यांचे ते राजकिय वारस ठरत आहेत या सर्व परिस्थितीत मंगळवेढ्यातील रतनचंद शहा सहकारी बँकेचे चेअरमन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांतिक सदस्य, शरद पवार यांचे अनुयायी राहुल शहा यांचा देखील प्रणिती शिंदे यांना अधिक लाभ होणार आहे .अल्पसंख्याक समाजाचे नेते तरुण वर्गात लोकप्रिय असून शाळा महाविद्यालय बँकिंग सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात मंगळवेढा तालुक्यातील युवक वर्गाचे ते आयडॉल आहेत याचाही लाभ आ .प्रणिती शिंदे ना होणार आहे सुशीलकुमार शिंदे व शाह कुटुंब यांचे अनेक वर्षाचे ऋणानुबंध आहेत. राहुल शहा यांचा वाडा, शहा परिवार यांची तिसरी पिढी सुशीलकुमार शिंदे यांना पारंपारिक रित्या मदत करत आली आहे. यावेळी देखील चांगली मदत करणार असल्याचे दिसत आहे. मंगळवेढा तालुक्याबरोबर पंढरपूर मधून विठ्ठल सहकारी साखर कारखाना चे चेअरमन अभिजीत आबा पाटील हे भारत भालके यांची उणीव भासू देणार नाहीत. पंढरपूर शहर व चाळीस गावातून प्रणिती शिंदे यांना निश्चित मताधिक्क मिळवून देतील अशी परिस्थिती आहे. पंढरपूर मंगळवेढा हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे हा बालेकिल्ला कायम ठेवण्याचा हे सर्वजण प्रयत्न करतील यातूनच आपले राजकीय कौशल्य ,आपली राजकीय ताकद पणाला लावत प्रणिती शिंदे यांना पंढरपूर मंगळवेढ्यातून लीड देण्याची परंपरा कायम ठेवतील असा विश्वास तालुक्यात निर्माण झालेला आहे या परिस्थितीतून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, शिवसेना उद्धव ठाकरे या तिन्ही पक्षाचे नेते कार्यकर्ते समर्थक यांना बरोबर घेऊन हे पाच जण प्रणिती शिंदे यांच्या विजयाचा पाया ठरतील या पद्धतीने यांचे कामकाज या मतदारसंघात होईल गेल्या दोन निवडणुकीतील पराभवाचा वचपा या निवडणुकीत निश्चित काढला जाईल असा विश्वास कार्यकर्त्यातून व्यक्त केला जात आहे
Post a Comment
0 Comments