मंगळवेढा/ विक्रांत पंडित
तालुक्याच्या दक्षिण भागातील जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून दुष्काळी जनतेचे तारणहार ठरलेले लोकप्रतिनिधी आमदार आदरणीय श्री.दादासाहेबांचा सोलापूर जिल्हा *राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्याध्यक्ष श्री.रामेश्वर जी मासाळ* यांच्या नेतृत्वाखाली *ग्रामपंचायत गोणेवाडी* येथील ग्रामस्थांनी जनसंपर्क कार्यालय मंगळवेढा येथे सन्मान केला.
.....तर आमदार आवताडे यांना आमच्या गावातूनच २००० मतांचे लीड देऊन त्यांच्या २०२४ आमदारकी साठी सिंहाचा वाटा उचलू अशी प्रतिज्ञा करणाऱ्या श्री.मासाळ यांनी ही योजना आ.दादासाहेब यांच्या प्रयत्नांतून मार्गी लागल्याने आपण दिलेल्या शब्दावर निश्चितपणे ठाम राहू असा पुनरुच्चार या भेटीदरम्यान केला केला.
महायुतीच्या घटक पक्षातील एका पदाधिकाऱ्याने आपल्या कामाबद्दल एवढा प्रचंड विश्वास व्यक्त करून त्यावेळी माझ्यात या विकास कामासाठी वेगळीच ऊर्जा प्रज्वलित केली होती अशी ग्वाही आमदार महोदय यांनी यावेळी दिली.
सदरप्रसंगी नगरसेवक श्री.अरुणभाई किल्लेदार, या भागाचे युवक नेते श्री
तानाजीआप्पा काकडे मालक, सरपंच श्री.बाबासाहेब मासाळ, उपसरपंच श्री.तानाजी चव्हाण, श्री.अंकुश बंडगर श्री.भाऊसाहेब कोळेकर, श्री.मनोहर मारकड, श्री.नितीन कांबळे, श्री.तानाजी कोळेकर श्री.बिरा मासाळ, श्री.विष्णू क्षिरसागर, श्री.सचिन जाधव आदी मान्यवर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते....💐
Post a Comment
0 Comments