Type Here to Get Search Results !

संतसूर्य

आ. राम सातपुते साठी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात आ समाधान आवताडे ,आ प्रशांत परिचारक होणार लक्ष्मण व शत्रुघ्न
मंगळवेढा/विक्रांत पंडित

सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी अखेर भारतीय जनता पक्षाच्या वतीने माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे . आ सातपुते यांना कमी कालावधीमध्ये संपूर्ण मतदारसंघात प्रचारासाठी फिरावे लागणार आहे वाड्यावर त्या गावात शहरात ठिकठिकाणीच्या मतदारांना भेटून त्यांना आपलेसे करून घ्यावे लागणार आहे .वेळ कमी असल्यामुळे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात आता आमदार राम सातपुते यांच्यासाठी थोडक्यात  फडणविस यांचे रामासाठी आमदार समाधान आवताडे व आमदार प्रशांत परिचारक यांना लक्ष्मण व शत्रुघ्न व्हावे लागणार आहे. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार असून या मतदारसंघात परिचारक अवताडे यांचे मोठे वर्चस्व आहे. भारतीय जनता पक्ष म्हणून व परिचारक व अवताडे गट म्हणून देखील या मतदारसंघात या जोड गोळीचे वर्चस्व आहे .राजकीय दृष्ट्या परिचारक अवताडे यांच्यात मतभेद असल्याचे दिसते सांगितले जाते परंतु मिलिटरी पेक्षा कडक शिस्तीचा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाकडे पाहिले जाते या परिस्थितीत परिचारक व अवताडे यांच्या कितीही रागलोभ असला तरी लोकसभेच्या निवडणुकीत या दोघांनाही दूध का दूध पानी का पानी करून दाखवावे लागणार आहे. मुळात राम सातपुते हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खंदे समर्थक असून फडणवीस यांनी सातपुते यांना सोलापुरातून उमेदवारी देऊ केली आहे परिचारक व अवताडे देखील फडणवीस यांचे समर्थक आहेत विधानसभेच्या निवडणुकीत कोणाला उमेदवारी मिळेल कोणाचे नशीब उजळेल हे त्यावेळी दिसणार आहे परंतु परिचारक अवताडे यांच्यासाठी लोकसभेची निवडणूक ही पूर्व परीक्षा नसून मुख्य परीक्षा राहणार आहे या मतदारसंघातून आतापर्यंत काँग्रेसला मताधिक्य मिळाले आहे अशा परिस्थितीत आमदार अवताडे यांना सतराशे कोटी रुपये चा निधी राज्य सरकारने दिला आहे तर परिचारक यांना देखील हजारो कोटीचा निधी विकास कामासाठी फडणीस यांच्या माध्यमातून मिळालेला आहे या पार्श्वभूमीवर मतदारसंघातून आमदार राम सातपुते यांना मताधिक्य मिळवूनच द्यावे लागणार आहे दामाजी कारखान्याच्या निवडणुकीत सहकारी साखर कारखाना असल्यामुळे सहकारात पक्ष बाजूला ठेवले जाऊन समविचारी आघाडी केली गेली. कारखान्याचा निकाल लागल्यापासून परिचारक अवताडे यांच्या समर्थकांत मोठ्या प्रमाणात मतभेद आहेत विशेषता मंगळवेढा मध्ये या कार्यकर्त्यांना जुळवून घेण्याची इच्छा देखील नाही परंतु पक्षापुढे खुद्द देवेंद्र फडणवीस यांचे देखील जास्त चालत नाही .उपमुख्यमंत्री पद पक्षाने आदेश दिल्याप्रमाणे घ्यावे लागले कोणताही खासदार कोणताही मंत्री इतकेच नव्हे केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री देखील झटक्यात बदलले जातात मालमत्ता ,राजकीय वारसा याला भाजपामध्ये अधिक महत्व नसून पक्ष संघटना पक्षासाठी निष्ठा याला अधिक महत्त्व आहे यामुळे परिचारक अवताडे यांच्यासह समर्थक देखील या निवडणुकीत गडबड करण्याची शक्यता फारच कमी दिसत आहे मात्र देवेंद्र फडणवीस यांचे दूत म्हणून आलेले आमदार राम सातपुते यांना पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून सालांकृत आहेर  मताधिक्याच्या रूपाने करण्याची जबाबदारी आमदार समाधान आवताडे व आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर निश्चितपणे आलेली आहे त्यामुळे राम सातपुते यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या रामासाठी आमदार समाधान आवताडे व प्रशांत परिचारक यांना लक्ष्मण व शत्रुघ्न व्हावे लागणार आहे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचा 35 गावचा शेतीचा प्रश्न मार्गी लावला आहे मंगळवेढ्यासाठी उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाले आहे निंबोनी येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्यात आले आहे मंगळवेढा शहरांमध्ये प्राथमिक शाळेच्या इमारतीसाठी साडेदहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झालेला आहे आठ कोटीचे नाट्यगृह उभा केले जाणार आहे शहरात तर ग्रामीण भागात देखील सर्वत्र डांबरी रस्ते झालेले दिसत आहेत सोलापूर कोल्हापूर पंढरपूर विजापूर हे मुख्य मार्ग देखील प्रशस्त व सुसज्ज झाले आहेत हा झालेला विकास आमदार समाधान आवताडे व आमदार प्रशांत परिचारक यांना शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचवावा लागणार आहे एकमेकांच्या नावावर खापर फोडण्यासाठी निवडणुकीत एकमेकाला झटका देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला झटका बसणार नाही याची काळजी पक्षाचे वरिष्ठ नेते घेत आहेत यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी ,काँग्रेस, उबाटा यांच्या समर्थकांमध्ये अवताडे व परिचारक यांच्यातील मतभेदाचा लाभ होईल अशा मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहेत या अपेक्षा यशस्वी करायच्या की फोल ठरवायच्या याची जबाबदारी आमदार समाधान आवताडे व आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर आहे या दोघांनाही पक्षाची शिस्त पक्षाचे नेतृत्व पक्षाचे नियम चांगले माहित आहेत यामुळे पोट निवडणुकीत देखील आमदार प्रशांत परिचारक यांनी माघार घेऊन समाधान आवताडे यांना मदत केली निवडून आणले त्यावेळी अनेक कार्यकर्ते परिचारक यांना सोडून देखील गेले परिचारक यांनी देखील मला पक्षाचा आदेश आहे मी अवताडे यांना मदत करणार आहे ज्यांना थांबायचे त्यांनी थांबा त्यांना नको असेल त्यांनी जावे या शब्दात स्पष्ट आदेश दिले होते. एकूणच या मतदारसंघातून काँग्रेसला जाणारे मताधिक्य बंद करून भाजपाच्या उमेदवाराला पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून मोठे मताधिक्य मिळवून देण्याची जबाबदारी आमदार प्रशांत परिचारक व आमदार समाधान आवताडे यांच्यावर आपसूकच आलेली आहे.

Post a Comment

0 Comments