सामाजिक जाणीव व जमीनीवर पाय असलेले समाजसेवक प्रा.शिवाजीराव काळुंगे सर
चेअरमन, शिवानद पाटील
मंगळवेढा/विक्रांत पंडित
धनश्री परिवाराचे सर्वेसर्वा आदरणीय प्रा.श्री शिवाजीराव काळुंगे सर यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या निमीत्ताने सरांचे आज सत्कार करण्यात आला. यावेळी चेअरमन शिवानंद पाटील व्हाईस चेअरमन तानाजी खरात, भीवानाना दोलतोडे काशिनाथ पाटील, औदुंबर वाडदेकर,राजू पाटील, महादेव लुगडे, डोके सर उपस्थित होते .
चेअरमन शिवानंद पाटील काळुंगे सरांविषयी बोलताना गेली अनेक दशके मंगळवेढा तालुकाच नव्हे तर सोलापूर जिल्हयाच्या राजकीय, सामाजीक, शैक्षणीक, आर्थिक, सहकार क्षेत्रामध्ये अलौकीक कार्य करणारे प्रा.शिवाजीराव काळुंगे यांनी त्यांच्या वयाची आज पंचाहत्तरी पुर्ण केली आहे.समाजामध्ये जिवन जगत असताना आपण समाजाचे देणे लागतो याचे भान ठेवून आदरणीय काळुंगे सरांचे कार्य चालू आहे.
आपले मंगळवेढा तालुक्याची दुष्काळी भाग म्हणुन ओळख आहे.या भागामध्येही पाणी यावे, शेतीचे नंदनवन व्हावे यासाठी काळुंगे सरांची तळमळ आहे .
जनसेवेचा वसा घेतलेल्या तालुक्यातील दुष्काळी भागाला पाणी देण्याची शपथ पुर्ण करणारे प्रा.शिवाजीराव काळुंगे सरांना निरोगी दिर्घायुष्य लाभो ही श्री संत दामाजी व विठ्ठल चरणी प्रार्थना केली .
Post a Comment
0 Comments