आमदार प्रणितीताई शिंदे यांचा आज मंगळवेढ्यात उर्वरित गावात दौरा,
भाजपच्या तुलनेत काँग्रेसचे संपर्क मध्ये आघाडी
मंगळवेढा /विक्रांत पंडित
सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाच्या संभाव्य उमेदवार आमदार प्रणितीताई शिंदे यांनी मंगळवेढा तालुक्यात दौरा सुरू केला आहे .सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांना न्याय देण्याच्या प्रयत्न करण्यासाठी त्यांनी या दौऱ्याचे नियोजन केले आहे .तालुक्यातील दुष्काळ शेतीच्या पाण्याच्या योजना ,पिण्याच्या पाण्याची योजना, महात्मा बसवेश्वरांचे स्मारक ,संत चोखामेळा यांचे स्मारक, पिक विमा, रस्ते, वीज ,पाणी आदि समस्या बाबत त्या जनतेच्या अडचणी समजून घेत आहेत. तालुक्याचे प्रश्न समजून घेत आहेत .नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी तालुक्यातील 24 गाव पाणी योजनेबाबत सरकारला धारेवर धरले होते. गेली दहा वर्ष केंद्रात भारतीय जनता पक्षाची सत्ता असून देखील या तालुक्याला न्याय मिळालेला नाही. अजून देखील केवळ आश्वासने देऊन बोळवण केली जात आहे .केंद्रात राज्यात सत्ता असताना सुद्धा 24 गाव योजनेला मंजुरी, निधी दिला जात नसल्यामुळे ही योजना सुरू झाली नाही. शेतकरी पाण्या पासून वंचित राहिलेला आहे.नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात या योजनेला एक रुपयाचाही निधी अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी दिला नाही .भारतीय जनता पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी केंद्रातून निधी देईन असे आश्वासन दिले होते. पंढरपूर पोट निवडणुकीत आमचा उमेदवार विजयी करा तुम्हाला पाणी मिळवून देत असे सांगितले होते. आज सत्ता येऊन दोन अडीच वर्षे झाली तरी देखील फडणवीस यांनी या 24 गावातील जनतेची शुध्द फसवणूक केली आहे .केंद्रात, राज्यात ,जिल्ह्यात ,तालुक्यात, ग्रामपंचायत, सोसायटी या ठिकाणी सत्ता असताना सुद्धा भारतीय जनता पक्षाचे नेते या दुष्काळ भागाला पाणी देत नाहीत. दिलेल्या आश्वासनाची जाणीव ठेवत नाहीत .या पार्श्वभूमीवर आमदार प्रणिती शिंदे तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला आपलेसे करून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत .पाटकळ मधील किरकोळ प्रकार वगळता त्यांच्या दौऱ्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे .त्यांच्यासमोर उमेदवार निश्चित नसल्यामुळे जनतेला देखील शिंदे बद्दल आपुलकी निर्माण झाली असून मंगळवेढा तालुका शिंदे परिवाराला मानणारा आहे .आत्तापर्यंत कायम या तालुक्याने शिंदे यांना मताधिक्य दिले आहे.
त्यांचा दौरा पुढील प्रमाणे आहे, सकाळी 9 :00 वाजता येड्राव, 9:30 वाजता खवे,10:00 वाजता जित्ती,11:00 वाजता निंबोणी,दुपारी 12:00 वाजता भाळवणी,12:30 वाजता हिवरगाव,1:30 वाजता खूपसंगी,2:00 वाजता जूनोनी,3:00 वाजता गोणेवाडी,4:30 वाजता लक्ष्मी दहिवडी,सायंकाळी 5:30 वाजता आंधळगाव,6:00 वाजता गणेशवाडी,6:30 वाजता शेलेवाडी,7:30 वाजता अकोला,8:00 वाजता कचरेवाडी असा त्यांचा गाव भेट दौरा आहे. काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष नंदकुमार पवार वकील , सुरेश कोळेकर,तालुका अध्यक्ष साळे, शिंदे, वाकडे, आईवळे, जावळे ,शेख, आदी मान्यवर या वेळी दौऱ्यात सहभागी होत आहेत.
Post a Comment
0 Comments