शिवानंद पाटील यांचे प्रतिपादन
मंगळवेढा/ विक्रांत पंडित
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचा २०२३-२४ सालच्या ३१ व्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ शुक्रवार ८ मार्च रोजी कारखान्याचे चेअरमन श्री शिवानंद यशवंत पाटील यांचे शुभहस्ते व व्हाईस चेअरमन श्री तानाजीभाऊ लक्ष्मण खरात यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला. तत्पूर्वी कारखान्याचे संचालक श्री दयानंद कल्लाप्पा सोनगे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ।कविता दयानंद सोनगे यांचे शुभहस्ते श्री सत्यनारायण महापुजेचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी ऊस वजन काट्यावर शेवटच्या बैलगाडीचे पुजन कारखान्याचे चेअरमन श्री शिवानंद पाटील, व्हा.चेअरमन श्री तानाजीभाऊ खरात ,पंचायत समितीचे उपसभापती काशिनाथ पाटील व संचालक मंडळ यांचे शुभहस्ते करण्यात आले.
गळीत हंगाम सांगता समारंभासाठी उपस्थितांचे स्वागत कार्यालयीन अधिक्षक श्री दगडू फटे यांनी केले तर प्रास्तावीक संचालक श्री दिगंबर भाकरे यांनी केले.
कार्यक्रम प्रसंगी चेअरमन श्री शिवानंद पाटील आपल्या मनोगतामध्ये म्हणाले कि, या गळीत हंगामाकरिता तालुक्यातील ऊस उत्पादक सभासद व शेतकयानी आमचे संचालक मंडळावर विश्वास ठेवुन गळीतासाठी मोठया प्रमाणावर ऊस पुरवठा केला. ऊस तोडणी, वाहतूक ठेकेदार,मजुर, हंगामी ठेकेदार,कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी चांगले काम केले आहे. कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.मारवाडी वकीलसाहेब, स्व.रतनचंद शहा शेठजी, स्व.चरणुकाका पाटील यांनी ही संस्था चांगल्या प्रकारे चालवून जोपासली आहे. तालुक्यातील शेतक-यांनी या संचालक मंडळावर विश्वास ठेवून अडचणीत असलेली ही संस्था आमच्या ताब्यात दिली आहे. संचालक मंडळानेही विश्वासास पात्र राहून काम केले आहे. या गळीत हंगामामध्ये शेतक-यांची ऊस बिले, तोडणी वाहतूक बिले, कामगार पगार वेळेवर देण्याचे धोरण अवलंबले. राहिलेली बिलेही मार्च २०२४ अखेर अदा करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे. आर्थिक अडचण असताना तसेच निसर्गाची साथ नसताना, उपपदार्थ प्रकल्प नसताना येथून पुढे आव्हानात्मक काम करावे लागणार आहे. शेतक-यांचा दामाजी कारखान्यावर विश्वास असल्यानेच हा गळीत हंगाम यशस्वी होवू शकलेला आहे. या गळीत हंगामामध्ये आजअखेर ३,८०,००० मे.टनाच्या वर गाळप झाले आहे. दुष्काळी परिस्थिती असतानाही जिल्हयातील इतर कारखान्याच्या तुलनेत दामाजी कारखान्याचे गाळप चांगले झाले आहे. कारखान्यातील अधिकारी, कर्मचारी यांनी प्रामाणीकपणे चांगले काम करुन हा गाळप यशस्वी केला असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले.
या कार्यक्रम प्रसंगी ऊस तोडणी, वाहतूकी मध्ये जास्तीत जास्त ऊस पुरवठा करणारे मुकादम, ठेकेदार बंडू करे, सुनिल जाधव, संजय जाधव, बैलगाडीवान सखाराम पठाडे, अजिनाथ पन्हाळकर, गोरख पठाडे, डंपींग तोडणी वाहतूक ठेकेदार-गाडीवान वसंत दोलतडे, सुभाष होनमाने, विकास चव्हाण आदिंना प्रोत्साहनपर बक्षीस देवुन त्यांचा मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
सदर प्रसंगी कारखान्याचे संचालक सर्वश्री मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणुकाका पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिध्द् लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर, सिध्द्ापुरचे बागायतदार शेतकरी संतोष सोनगे,हाजीमलंग शेख, महादेव जाधव, शिवगोंडा पाटील, सिध्द्ाराम व्हनुटगी, दादा ढावरे, राजकुमार अडाळे,मुढवीचे बागायतदार कल्याण रोकडे, सरपंच महावीर ठेंगील, हणमंत रोकडे, मंगळवेढयाचे विजय बुरकूल, आदिसह सभासद-शेतकरी, तोडणी वाहतूक ठेकेदार, अधिकारी, खातेप्रमुख, विभागप्रमुख, कर्मचारी, कामगार संघटना व कामगार पतसंस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अशोक उन्हाळे यांनी केले तसेच उपस्थितांचे आभार शेती अधिकारी कृष्णांत ठवरे यांनी मानले.
Post a Comment
0 Comments