24 गाव उपसा सिंचन योजनेला मंजुरी व निधी आणल्याबद्दल आमदार समाधानदादा अवताडे यांचा सजग नागरिक संघाच्या वतीने सत्कार
मंगळवेढा/ विक्रांत पंडित
मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील 24 गाव पाणी योजना अनेक वर्षापासून रखडली होती मी प्रयत्न केले माझ्या प्रयत्नाला यश आले माझ्या नशिबातच होते की हे काम माझ्या हाताने व्हावे. या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी मला मिळाली याचे मी भाग्य मानतो असे मत आमदार समाधान दादा अवताडे यांनी आज व्यक्त केले ते सजग नागरिक संघाच्या वतीने केलेल्या सत्कार ला उत्तर देताना बोलत होते. तालुक्यात राजकारण असेल पक्ष गट तट असतील परंतु विकास कामाबाबत मी सर्वांना बरोबर घेण्यास तयार आहे मी सर्वांना बरोबर घेऊन विकास कामे करत आहे सदर नागरिक संघाने मला आत्तापर्यंत विधायक कामासाठी सहकार्य केले आहे या पुढील काळात देखील असेच सहकार्य करावे यातून आपल्या मतदारसंघातील मंगळवेढा तालुक्याचा विकास नक्की होईल ही योजना मार्गी लावण्यासाठी मी रात्रंदिवस एक करून पाठपुरावा केले माझे राजकीय कौशल्य व कसबपणाला लावले. रात्रभर जागून पाठपुरावा करून मंजूर या मिळवले आहेत आता शेतकऱ्यांच्या शेतात पाणी आलेले पाहीले नंतरच मला समाधान होणार आहे.
मंगळवेढा तालुक्यातील २४ गाव उपसा सिंचन योजनेला अंतिम मंजूरी प्राप्त होण्यासाठी आपल्या प्रयत्नांची बाजी लावणारे पाणीदार आमदार मा.श्री.समाधानदादा आवताडे यांचा *"सजग नागरिक संघ मंगळवेढा"* यांच्यावतीने अभिनंदन पर सत्कार करण्यात आला.
जेष्ठ आणि श्रेष्ठ नागरिकत्वाच्या भूमिकेत असणाऱ्या सजग नागरिक संघाचे दिशादर्शक मार्गदर्शन तालुक्यातील विविध बाबींचा सतत मागोवा घेत असते. सार्वजनिक जीवनाच्या समाजकारण व राजकारण कार्यक्षेत्रात आमदार आवताडे यांच्या लोक सेवाभावी कार्याचे आणि नेतृत्व कौशल्याचे उपस्थिती मंडळींनी विशेष स्वागत केले.
यावेळी श्री संत दामाजी मंदिर समितीचे अध्यक्ष श्री.बापू आवताडे, सजग संघाचे सचिव कृषिभूषण श्री.अंकुश पडवळे, कृषी उद्योजक व सजग नागरिक संघाचे अध्यक्ष श्री.संजय कट्टे-पाटील सर, माजी शिक्षणाधिकारी श्री.ज्ञानदेव जावीर साहेब, श्री.दिलीपकुमार धनवे, माजी नगरसेवक श्री. अरुणभाई किल्लेदार श्री.भारत कट्टे, श्री.सतिश हजारे, संपादक प्रा.श्री.विक्रांत पंडित सर, श्री.विठ्ठल आसबे श्री. विजयसिंह गायकवाड गुरुजी, श्री.नितीन सुरवसे, माजी गटशिक्षणाधिकारी श्री.हणमंतराव कोष्टी आदी आदी मान्यवर व संघाचे इतर सदस्य उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments