24 गाव पाणी योजनेला निधी देण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांची गॅरेंटी
कामाचा आमदार म्हणून ओळख
मंगळवेढा/ विक्रांत पंडित
मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील दुष्काळी 24 गावांना मंगळवेढा उपसा सिंचन योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाकडून मुख्यमंत्री यांची मंजुरी मिळाली आहे आता मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर या योजनेला निधी घेऊनच कामाला सुरुवात होईल मंजुरी व निधी हा लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी देखील मिळू शकणार आहे. फार झाले तर लोकसभेची निवडणूक संपताच या योजनेसाठी निधी मिळून कामाला सुरुवात होणार आहे या शब्दात पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार समाधानदादा अवताडे यांनी 24 गाव योजनेला मंजुरी व निधी ही माझी गॅरंटी आहे या शब्दात आपली भावना व्यक्त केली .स्वातंत्र्य काळापासून या भागात पाणी मिळत नाही माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या काळात चाळीस धोंडा, तेल धोंडा या नावाने या योजना शेतकऱ्यांना सांगितल्या जात होत्या त्यांच्या पश्चात डॉ. राम साळे यांनी या योजना म्हणजे मृगजळ असल्याचे स्पष्ट केले होते. 2000 या साला पर्यंत पाणी संघर्ष समिती, तालुक्यातील राजकीय नेते कार्यकर्ते आंदोलन करत होते मात्र त्यानंतर आंदोलने बंद झाली .2009 मध्ये बहिष्काराचे आंदोलन आले त्यानंतर या भागाकडे केवळ राजकीय नजरेतूनच पाहिले गेले प्रत्यक्ष काम झाले नाही ही योजना शासन पातळीवर मंजूर नसल्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्र्यांना या योजनेसाठी निधीचे नियोजन करता आलेले नाही. योजनेला मंजुरी नाही ,हेड नाही मग योजनेसाठी रक्कम कोणत्या हेड वर टाकणार असा प्रश्न असल्यामुळे नुकत्याच झालेल्या अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार यांनी या योजनेला निधी दिलेला नाही .मात्र मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर या योजनेसाठी निधीची तरतूद करून निधी देता येणे शक्य आहे .आमदार समाधानदादा अवताडे यांनी 24 गाव योजनेला निधी देण्यासाठी शेतकऱ्यांना हमी दिली आहे. तर राजकीय नेते कार्यकर्ते यांना गॅरंटी दिली आहे यामुळे आमदार अवताडे यांच्या काळातच 24 गाव योजनेला निधी मिळून काम सुरू होणार असल्याचे शाश्वत वाटत आहे म्हैसाळ योजनेला खासदार संजयकाका पाटील यांनी केंद्रातून एआयबीपी च निधी आणून काम पूर्ण केले. यामुळे मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी गावांना पाणी मिळाले आहे आता आमदार समाधान आवताडे या 24 गावांना निश्चितपणे पाणी मिळवून देणार असल्याचे स्पष्टपणे सांगत आहेत यामुळे येत्या काही दिवसात नसेल तर काही महिन्यात मंजुरी व निधी मिळणार असल्याचे विश्वास शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे मंगळवेढा तालुक्यामध्ये आत्तापर्यंत झालेल्या लोकप्रतिनिधी मध्ये कमी कालावधीमध्ये अवघ्या दोन ते अडीच वर्षात 1700 कोटी रुपयांचा निधी आमदार अवताडे यांनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात आणला आहे पंढरपूर तालुक्यांमध्ये औद्योगिक वसाहतीचे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच कामाचे भूमिपूजन होईल अशी कामाची प्रगती आहे . निंबोणी येथे नवीन ग्रामीण रुग्णालय मंजूर करून जागा उपलब्ध केली आहे तर मंगळवेढ्यात दोनशे बेडचे संपूर्ण सोयीने युक्त असे रुग्णालय मंजूर करून घेतले आहे.आमदार अवताडे राजकीय भाषणे कमी करत असून प्रत्यक्ष कृतीवर भर देत असल्यामुळे मतदारसंघात त्यांची कामे उठून दिसत आहेत कामाचा आमदार म्हणून त्यांची ओळख निर्माण झालेली आहे
Post a Comment
0 Comments