Type Here to Get Search Results !

संतसूर्य

24 गाव पाणी प्रश्न राज्य मंत्रिमंडळाच्या मंजुरीमुळे लोकसभा निवडणुकीत भाजप विरोधकांची गोची 

मंगळवेढा/संतसूर्य वृत्तसेवा 

 मंगळवेढा तालुक्यातील 24 गाव पाणी प्रश्न आज राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली .तीन साडेतीन वर्षांपूर्वी पोटनिवडणुकीमध्ये आमदार समाधानदादा अवताडे विजयी झाले. तत्कालीन विरोधी पक्षनेते विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुम्ही या पोटनिवडणुकीत समाधान आवताडे यांना विजयी करा मी तुम्हाला 24 गाव योजनेला निधी मिळवून देईन असे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पूर्तता जलसंपदा मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण करून दिली आहे .मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी आज घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 24 गाव पाणी उपसा सिंचन योजनेला मंजुरी दिली आहे. मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी 24 गावांमध्ये आमदार समाधान आवताडे यांनी केलेल्या प्रयत्नामुळे पाणी मिळणार असल्यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली. आता एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या 24 गाव योजनेला मंजुरी देण्यात आली आहे त्यापूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांनी या एकदा या योजनेला मंजुरी दिली होती परंतु मंत्रिमंडळामध्ये त्या योजनेला मंजुरी मिळू शकली नव्हती आता शासन पातळीवरील सर्व मंजूरी व अटीची तरतूद पूर्ण झाली असून मंत्रिमंडळाची मंजुरी झाली आहे. आता निधी देऊन या योजनेचे काम सुरू होणार आहे सुरुवातीला साडेसातशे कोटी रुपयांची असलेली ही योजना आता प्रत्यक्षात सुरू होण्यासाठी सज्ज झाली आहे आत्तापर्यंत या योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी नसल्यामुळे राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याच्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी निधीची तरतूद करता येत नव्हती परंतु आता पुरवणी यादीमध्ये निधीची तरतूद करून हे काम प्रत्यक्ष सुरू करता येणार आहे .भूमिपुत्र आमदार असल्यानंतर काय करता येते हे केवळ चमत्काराने नव्हे तर आपल्या संयमी पाठपुरावा ने, डोक्यात विकासाचे चक्र हे ठेवून, कमी बोलणारे आमदार समाधान आवताडे यांनी सभागृहात बोलून शासन पातळीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जलसंपदा मंत्री यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून या योजनेला मंजुरी मंत्रिमंडळाची मंजुरी मिळवली आहे .यामुळे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात गेली पन्नास वर्षे गाजत असलेला निवडणूक काळात वादग्रस्त ठरत असलेला पाणी प्रश्न आता या मंत्रिमंडळाच्या मंजुरीमुळे निकालात निघालेला आहे .काही दिवसापूर्वी आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या मंगळवेढा तालुका दौऱ्यात त्यांनी या पाणी प्रश्नाकडे युती शासनाचे दुर्लक्ष आहे .ठेकेदार जगविण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करत आहे.या चोवीस गावातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले जात नाहीत अशा विविध प्रकारचे आरोप आमदार शिंदे यांनी केले होते .अगदी समाधान आवताडे हे आपल्या नातेवाईकामार्फत मराठा आरक्षणाच्या नावाखाली पाटकळ येथील बैठकीत गोंधळ करत होते अशा देखील आरोप शिंदे यांनी केले होते याशिवाय या भागातील प्रश्न सत्ताधारी केंद्र व राज्य शासन सोडवत नाही असा आरोप देखील आमदार प्रणिती शिंदे यांनी केला होता या सर्व आरोपांना तसेच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात या 24 गाव योजनेसाठी निधीची तरतूद केली नाही. आमदार जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पात्र नाहीत. त्यांच्या हातून प्रश्न सोडवले जात नाहीत अशा प्रकारची टीका अभिजीत पाटील यांनी केली होती आमदार प्रणिती शिंदे व अभिजीत पाटील यांच्या टीकेला आमदार व आमदार यांच्या समर्थकांनी कोणतेही प्रकारचे प्रत्युत्तर न देता केवळ आमदार समाधानदादा अवताडे यांनी आपल्या कृतीतून उत्तर दिले आहे .24 गाव योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळवून दिले तर मंगळवेढा पंढरपूर तालुक्यातील पावसामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना सुमारे 17 ते 18 कोटी रुपयांची नुकसान भरपाई आमदार अवताडे यांनी महायुती शासनाकडून मतदार संघातील शेतकऱ्यांना मिळवून दिलेली आहे. आमदार समाधान आवताडे हे काम करणारे आमदार आहेत. बोलण्यापेक्षा कृतीवर त्यांचा अधिक भर आहे .भूमिपुत्र असलेल्या आमदाराला केवळ मंगळवेढा शहर व ग्रामीण पंढरपूर शहर व पंढरपूर ग्रामीण असा मतदारसंघातील विकासाचा ध्यास आहे. या 24 गाव पाणी प्रश्न मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर आता आमदार समाधान आवताडे यांचे ध्येय पंढरपूर मधील औद्योगिक वसाहतीचे आहे. हे देखील काम लवकरच होणार असल्याचा विश्वास आमदार आवताडे यांनी व्यक्त केला आहे .पंढरपूर येथील सुशिक्षित बेकार युवकांना उद्योगधंदे उभे करण्यासाठी एमआयडीसी उभा करून दिली जाणार आहे. मंगळवेढा तालुक्यातील महात्मा बसवेश्वरांचे स्मारक ,संत चोखामेळाचे स्मारक काही महिन्यानंतर मंजूर मिळून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल अशा पद्धतीचा पाठपुरावा आमदार अवताडे यांनी सुरू ठेवलेला आहे . आत्तापर्यंतच्या आमदारापेक्षा आमदार समाधान दादा अवताडे यांनी मंगळवेढा तालुक्यात सर्वाधिक निधी मिळवलेला आहे सुमारे 1700 ते 1800 कोटी रुपये चा निधी मतदार संघात आणला असून मंगळवेढा शहरातील नगरपालिकेच्या प्राथमिक शाळेला साडेदहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून मंगळवेढा नगरपालिकेच्या प्राथमिक शाळेच्या इतिहासात ही ऐतिहासिक नोंद झालेली आहे ज्या मराठी शाळेत आमदार समाधान आवताडे शिकले त्या ठिकाणी त्यांनी सुमारे साडेतीन ते चार कोटी रुपये चा निधी उपलब्ध करून दिलेला आहे .यावरून मंगळवेढा तालुका व पंढरपूर मतदार संघ या ठिकाणी आमदार समाधान आवताडे विकास कामासाठी किती कष्ट घेत आहेत, किती प्रयत्न, पाठपुरावा करत आहेत हे आता मतदारसंघातील जनतेने पाहिले असून जनतेला लक्षात देखील आलेले आहे .

Post a Comment

0 Comments