दामाजीचे १५ फेब्रुवारी अखेरचे ऊस बिल २७०१/- प्रमाणे बँकेत जमा
हंगामात गळीतास आलेल्या ऊसाचे बिल ३१ मार्च अगोदर अदा करणार-
चेअरमन-श्री शिवानंद पाटील
मंगळवेढा/ संतसूर्य वृत्तसेवा
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चालु गळीत हंगामातील १ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत गाळप केलेल्या शेतकयांचे ऊसाचे प्रमेटन रु२७०१/-प्रमाणे बील संबंधीत ऊस पुरवठादार सभासद शेतकÅयांचे सोईनुसार धनश्री पतसंस्थेच्या सर्व शाखा, जिजामाता पतसंस्था मंगळवेढा, रतनचंद शहा सह।बँक-मंगळवेढा इत्यादी संबंधीत बँकां/पतसंस्थामधील खात्यामध्ये वर्ग केले आहे. याशिवाय ।०१/०२/२०२४ ते १५/०२/२०२४ या कालावधीची ऊस तोडणी वाहतुक बिले संबंधीत बँका पतसंस्थाकडे ठेकेदारांचे नांवावर यापुर्वीच वर्ग केलेली आहेत. कारखान्याचे शेती विभागाकडील कर्मचाÅयांकडून ऊस बिलाची पावती घेवून संबंधीत बँकेतून ऊस बीलाची रक्कम घेवून जावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन श्री शिवानंद पाटील यांनी केले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले कि, कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील संपुर्ण ऊसाचे गाळप करुन सन २०२३-२४ चा गळीत हंगाम दि ८/३/२०२४ रोजी बंद केला आहे. या हंगामात मंगळवेढा तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला नसताना, पाण्याच्या गंभीर टंचाईमुळे कार्यक्षेत्रात अपूरा ऊस असतानाही गळीत हंगामाकरिता तालुक्यातील ऊस उत्पादक सभासद व शेतकÅयानी आमचे संचालक मंडळावर विश्वास ठेवुन दामाजी कारखान्याचे गळीतासाठी मोठया प्रमाणावर ऊस पुरवठा केला. कारखान्यासमोर आर्थिक अडचणी असतानाही सभासद शेतकÅयांचे ििवश्वासाला पात्र राहणेसाठी हंगाम अखेर गळीतास आलेल्या संपुर्ण ऊसाची बिले, ऊस तोडणी वातहुक यंत्रणेची बिले ३१ मार्च २०२४ अगोदर देण्याची व्यवस्था करित आहोत. कारखान्याचे सभासद, उŠस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतुक ठेकेदार तसेच कारखान्याचे कामगारांच्या मोलाचे सहकार्यामुळेच हंगाम यशस्वीपणे पार पडला आहे. दुष्काळी परिस्थिती असतानाही जिल्हयातील इतर कारखान्याच्या तुलनेत दामाजी कारखान्याचे गाळप चांगले झाले आहे. कारखान्यातील अधिकारी, कर्मचारी यांनी प्रामाणीकपणे चांगले काम करुन हा गाळप हंगाम यशस्वी करणेसाठी सहकार्य केलेबध्द्ल समाधानी असलेचे त्यांनी सांगीतले.
याप्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री तानाजीभाऊ खरात, संचालक सर्वश्री मुरलीधर दत्तू,गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणुकाका पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिध्द् लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर, प्र.कार्यकारी संचालक रमेश जायभाय यांचेसह सर्व खातेप्रमुख, विभाग प्रमुख उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments