Type Here to Get Search Results !

संतसूर्य

आ. प्रणिती शिंदे यांचा मंगळवेढा तालुका दौरा, तर नंदकुमार पवार वकील यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड काँग्रेस कार्यकर्ते , काँग्रेस प्रेमी आनंदाचे वातावरण


मंगळवेढा/ प्रा.विक्रांत पंडित

 सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या औपचारिकतेने व कार्यकर्त्यांना भेटून सर्वसामान्य जनतेच्या समस्या जाणून घेण्याच्या उद्देशाने आमदार प्रणितीताई शिंदे यांनी दोन दिवस मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागात दौरा केला .मराठा आरक्षण पासून 24 गावचा शेतीचा पाण्याचा प्रश्न  या सर्व प्रश्नांना त्या सामोरे गेल्या मराठा आरक्षणातील युवकांनी पाटकळ येथे सभा घेऊ देणार नाही तीव्र विरोध केला परंतु आमदार शिंदे यांनी आंदोलन कर्त्या बरोबर चर्चा करण्यास सामोरे  गेल्या.  मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. विधानसभेत पाठिंबा दिला आहे.इतकेच सांगून त्या थांबल्या नाहीत तर त्यांनी मी तालुक्यातील प्रश्न समजून घेऊन सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करत आहे त्यामध्ये मराठा आरक्षण, 24 गावचा पाणी प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न ,पीक विमा , पाणी, वीज शिक्षण ,आरोग्य याबाबतीत केंद्र व राज्य शासन नापास झाले असल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या समजून घेऊन सोडवण्यासाठी मी कार्यरत आहे असे सांगून आंदोलनाला त्या सामोरे गेल्या यामुळे काँग्रेस नेते कार्यकर्ते यांच्या देखील प्रचंड उत्साह निर्माण झाला. आ शिंदे यांच्या दौऱ्यामुळे तर पवार वकील यांच्या कार्याध्यक्ष पदाच्या निवडीमुळे शहर व तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांना काँग्रेस प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे मंगळवेढा शहर व चार जिल्हा परिषद गट यामध्ये काँग्रेस प्रेमींना आता आशा निर्माण झाली आहे. मुळात मंगळवेढा तालुका हा काँग्रेस ला मानणार आहे माजी मंत्री लक्ष्मीराव ढोबळे यांच्या वीस वर्षाच्या काळात पंचायत समिती कायम मारवाडी वकिलांच्या ताब्यात होती. इतकेच नव्हे तर काँग्रेसला तालुक्यात नेतृत्व नसल्यावर सुद्धा काँग्रेस प्रेमी जनता काँग्रेसलाच मतदान करते याचा अनुभव देखील आलेला आहे. मोदी लाटेत देखील या तालुक्याने काँग्रेसला मताधिक्याची भेट दिलेली आहे .अशा परिस्थितीत लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जाताना आमदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवेढा तालुक्यातून सुरुवात केल्यामुळे काँग्रेसला काँग्रेस प्रेमी नागरिकांना काँग्रेस कार्यकर्त्यांना आता हा आपला काँग्रेसचा पूर्वीचा बालेकिल्ला आपण परत एकदा आपल्या ताब्यात घेऊ शकतो असा विश्वास निर्माण होऊ लागला आहे .भारतीय जनता पक्षाकडे ताकद आहे कार्यकर्ते आहेत श्रीमंती , ठेकेदार आहेत परंतु सर्वसामान्य जनता महागाई, गॅस सिलेंडर, पासून अनेक गोष्टीला त्रस्त आहे या परिस्थितीचा लाभ आमदार प्रणिती शिंदे यांना होईल यासाठी काँग्रेस प्रेमी व काँग्रेस कार्यकर्ते मनापासून झटत जाऊ लागले आहेत या दौऱ्यात अँड.नंदकुमार पवार प्रा. शिवाजीराव काळुंगे, ऍड अर्जुनराव पाटील ,ऍड रविकिरण कोळेकर, सुरेश कोळेकर, तालुका अध्यक्ष प्रशांत साळे ,पांडुरंग जावळे , अशोक चेलेकर,मनोज माळी, विष्णु शिंदे, दिलीप जाधव,मारुती वाकडे, राजाभाऊ चेळेकर , इसाक शेख, मुबारक शेख, यांच्यासह अनेक नेते कार्यकर्ते ग्रामीण भागातील सरपंच, उपसरपंच, सोसायटी सदस्य, ग्रामपंचायत सदस्य या दौऱ्यामध्ये सहभागी झाले होते

Post a Comment

0 Comments