मंगळवेढा/संतसूर्य वृत्तसेवा
संघर्ष, कर्तृत्व, निर्धार आणि स्वतंत्र वृत्तीच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण केलेल्या आज महिला अनेक क्षेत्रात घरकाम सांभाळून प्रगती करीत आहेत. बदलत्या परिस्थितीत मात्र स्त्री ची भूमिका बदलली आहे. ती मुलगी, सून, पत्नी, आई, या भूमिका व्यतिरिक्त, जिल्हाधिकारी, उपजिल्हा अधिकारी, तहसीलदार, मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी, सायंटिस्ट, शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षक अशा अनेक रुपानी आहे. तिच्या जीवनाला अनेक पैलू लाभले आहेत आणि तिने आपल्या कर्तृत्वाने त्यांना अधिक तेज, चमक, दिली आहे. स्त्री ही आज अनेक क्षेत्रात पुढे आहे. आज आपण अशाच महिला विषयी जाणून घेणार आहोत, ज्या समाजातील इतर महिलासाठी प्रेरणादायी आहेत. माझ्या मते प्रेरणा एखाद्या व्यक्ती कडून नाही तर त्यांनी केलेल्या संघर्षातून घ्यावी. शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी तेवढे श्रम करण्याची तयारी हवी. प्रत्येक महिला स्वतःच प्रेरणेचा स्रोत असतें. प्रत्येक महिला प्रसिद्ध होतेच असे नाही, आपण आपल्या आजूबाजूला पाहिल्यावर लक्षात येईल कि आपल्या आजूबाजूला अशा बऱ्याच महिला आहेत ज्या प्रसिद्ध नाहीत पण त्यांच्याकडून शिकण्यासारखे बरंच कांही आहे . महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत पंचायत समिती अक्कलकोट येथील अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या आणि आपल्या कुटुंबासाठी दिवस रात्र कष्ट करणाऱ्या कर्तृत्ववान आणि प्रेरणादायी असलेल्या सौ शुभदा सतीश जेऊरकर यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत.
सौ शुभदा सतीश जेऊरकर या पुर्वा श्रमीच्या कु शुभदा शशिकांत दीक्षित, आईचे नांव सौ शालिनीताई. याना 2 मुले व एक मुलगी अशी तीन अपत्ये. श्री शशिकांत दीक्षित उस्मानाबाद येथे जिल्हा न्यायालयात रजिस्ट्रार या पदावर कार्यरत होते. आई शालिनी सोलापूर महापालिकेच्या शाळेत शिक्षिका होत्या. त्याकाळी सुद्धा एक मुलगी म्हणून कोणतीही वेगळी भूमिका न घेता त्यांनी मुलीला उच्य शिक्षण दिले त्या बी कॉम एम एस डब्ल्यू फॅमिली अँड चाईल्ड वेलफेअर आहेत. तद नंतर त्यांनी उस्मानाबाद येथील बाल सेविका प्रशिक्षण केंद्रात एक वर्ष व्याख्याती म्हणून सेवा केली. त्या दरम्यान सोलापूर येथील सेवा निवृत्त मुख्याध्यापक, सोनार समाज भूषण श्री ईराप्पा गणपती जेऊरकर गुरुजी यांच्याकडून त्यांच्या मुलासाठी विवाहाचा प्रस्ताव आला. आणि त्या दिनांक 24 मे 1991 रोजी सौ शुभदा सतीश जेऊरकर झाल्या. सासूबाई सौ लक्ष्मीबाई या गृहिणी होत्या. लग्नानंतर ही समाज कल्याण खात्या द्वारे चालवल्या जाणाऱ्या वाशी तालुका भूम येथील मुलींच्या हॉस्टेल मध्ये कांही काळ हॉस्टेल सुपरीण्डेण्ट म्हणून काम केले. त्यादरम्यान पुणे विभाग दुय्यम सेवा मंडळाची अंगणवाडी पर्यवेक्षिकेची जाहिरात आली, जाहिरातीस अनुसरून. अर्ज करून या पदासाठी त्यांची मेरिट मध्ये निवड झाली. एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येते, अक्कलकोट पंचायत समिती येथे अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदावर त्या हजर झाल्या. एकत्र कुटुंबात वृद्ध सासू सासरे, 2 लहान मुले, पती श्री सतीश हे श्राविका शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून सेवेत असल्यामुळे सांसारिक कर्तव्ये पार पाडताना त्यांची कसरत व्हायची , सौ शुभदा मॅडम नोकरी करतात म्हटल्यावर वृद्ध सासू सासऱ्याकडे दुर्लक्ष होत असणार असे वाटण्याची साहजिकच शक्यता आहे पण तसें अजिबात नाही. त्या घरातील प्रत्येकाकडे व्यवस्थित लक्ष देऊन सासू सासऱ्यांना कोणताही त्रास पडू नये म्हणून ते आनंदात व सुखात रहावं या दृष्टीने त्यांनी त्यांची अत्यंत्यिक काळजी घेतली. त्यांचे सासरे श्री ईराप्पा जेऊरकर गुरुजी म्हणायचे, " अशी चांगली सून लाभली ही परमेश्वराची मोठी कृपाच आहे. आमच्या दृष्टीने भाग्याची व समाधानाची गोष्ट आहे. घरी वृद्ध सासू सासऱ्यांची काळजी घेण्यात त्यानी कधीच दुर्लक्ष केला नाही, त्यांचा त्यांनी सांभाळ केला त्या एक आदर्श सून आहेत हे मी गौरवाने त्यांचा उल्लेख करतो. अशा परिस्थितीत पण त्यांनी बाल कल्याण क्षेत्रात काम करण्याची उत्तम संधी असताना होणाऱ्या श्रमाकडे जास्त लक्ष दिले नाही उलट त्यांनी त्या संधीचे सोनं केल असच म्हणावे लागेल. त्यांच्या कार्याविषयी सांगायचे म्हटले तर अंगणवाडी सुपरवायझर - साधारणपणे लोकांना काय करतात हे माहीतच नसते.
.महाराष्ट्र शासनाकडून ग्रामीण व शहरी भागात अंगणवाडी केंद्रे चालवली जातात. त्यामार्फत गरोदर महिला ,स्तनदा माता, तसेच शून्य ते सहा वर्ष वयोगटातील बालकांना सर्वांगीण विकासासाठी सेवा पुरवल्या जातात. यामध्ये सर्वांना आहार व आरोग्य याबाबत समुपदेशनातून मातांची क्षमता बांधणी केली जाते. ग्रामीण मातांना वारंवार आहार व आरोग्य याबाबत मार्गदर्शन केले जाते. तसेच कमी वजनाच्या म्हणजेच कुपोषित बालकांना वरच्या नॉर्मल श्रेणीत आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात.
एकूण आज पर्यंतच्या 26 वर्षाच्या सेवा कालावधीतून वरील सर्व कामकाजावर नियंत्रण करणे, वेळो वेळी गावातील महिलांना तसेच हाताखाली कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मार्गदर्शन करणे ही कामे त्यांनी प्रामाणिकपणे करत आहेत. त्यांच्या कार्यकाळात कमी व तीव्र वजनाच्या बालकांना सिव्हिल हॉस्पिटल तसेच प्रायव्हेट बालरोगतज्ञ यांच्यामार्फत सवलतीच्या दरात सेवा उपलब्ध करून देणे,तसेच हृदयाला छिद्र असणाऱ्या किंवा हृदयाचे आजार असणाऱ्या बालकांचे यशस्वी ऑपरेशन अश्विनी हॉस्पिटल सोलापूर येथून करून घेऊन व त्या बालकांना जीवदान दिले. बऱ्याचदा चांगल्या चांगल्या शिक्षित महिलांना सुद्धा गरोदरपणामध्ये कोणती काळजी घ्यायची, काय खायचं किंवा जन्मल्यानंतर बाळाला किती दिवस दूध पाजायचं आणि केव्हापासून खायला घालायचं या गोष्टी माहीत नसतात या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. याबाबत मातांना वारंवार सांगून. त्यांनी त्यांच्यामध्ये बदल घडवून आणले आहेत.
एकंदर त्यांच्या कामाचे स्वरूप व कामाबद्दल असलेली तळमळ पाहून शासनाकडून वेळोवेळी विविध प्रशिक्षणासाठी मास्टर ट्रेनर म्हणून त्यांची नेमणूक केली गेली. तेही काम त्या अत्यंत आवडीने केले आहेत. तसेच सध्या राज्यस्तरावरील युनिसेफ कडून होणाऱ्या प्रशिक्षणासाठी 'की ट्रेनर' म्हणून त्या काम पाहतात. नोकरीच्या सोबत फक्त वेतन मिळवणं हा एकच उद्देश नसून त्या या कामात त्यांनी सेवा व आनंद मिळवला. कार्यकाळामध्ये 'आदर्श पर्यवेक्षिका' हा जिल्हा परिषद, सोलापूर यांचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे.
लहान बालकांच्या व अज्ञानी महिलांना वारंवार मार्गदर्शन करून त्यांच्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे हे काम अत्यंत आवडीने व प्रामाणिकपणे त्या करीत आहेत, व त्याचेच फळ त्यांना जीवनात वारंवार मिळत गेले. त्यांची मुले, त्यांचं कुटुंब सर्व सुखी व समाधानी असल्याचे केवळ लहान बालकांच्या आशीर्वादामुळे आहे असे त्यांना वाटते. त्यांना दोन मुले असून दोन्ही मुले इंजिनिअर आहेत मोठी सून देखील इंजिनिअर आहे. प्रामाणिक आणि. निरपेक्ष सेवेमुळे त्याचे फळ त्यांना आयुष्यात वारंवार मिळत गेले. त्यांचे पती श्री सतीश इरप्पा जेऊरकर हे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त असून निवृत्त आहेत. सामाजिक कार्यात ते नेहमी सक्रिय असतात. सौ शुभदा जेऊरकर मॅडम या महिला व बालकल्याण च्या पवित्र क्षेत्रात उभे आयुष्य वेचले आहे.आपल्या कार्यक्षेत्रात सोलापूर जिल्ह्याला अभिमान वाटावा अशी उत्तुंग भरारी घेऊन काम नव्हे तर कर्तव्य या जाणीवेतून त्यांच्या कडून होत असलेले हे कार्य कोणत्याही व्रतापेक्षा कमी नाही . आपले कार्यक्षेत्र हेच कुटुंब समजून सदृढ, निकोप आणि सक्षम समाज निर्मितीसाठी आपला अमूल्य योगदान देत असलेल्या सौ शुभदा जेऊरकर मॅडम बद्दल आम्हास सार्थ अभिमान आहे. आपल्या अमूल्य योगदानाचा व यशस्वी वाटचालीचा कृतार्थ सन्मान पांचाळ सोनार समाज गौरव समिती तथा सोनार समाज संघटना सोलापूर यांनी राज्यस्तरीय समाज गौरव पुरस्कार प्रदान करून सन्मान केलेला आहेच. शैक्षणिक दृष्ट्या हुशार, यशस्वी प्रशासकीय कर्मचारी , गृहकृतव्य दक्ष , प्रेमळ सुस्वभावी अशा सौ शुभदा सतीश जेऊरकर यांना परमेश्वराने उदंड, निरामय आयुष्य देऊन सुखासमाधानात ठेवावे, त्यांच्यावर सर्व प्रकारच्या आनंदाचा वर्षाव व्हावा ही सदिच्छा व्यक्त करतो आणि त्यांच्या उर्वरित सेवेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देऊन येथेच थांबतो. प्रशासकीय सेवेत आणि समाजकारणात वेगळा ठसा उमटून सोनार समाजाचे नांव लौकिक करणाऱ्या सौ शुभदा जेऊरकर यांचा मोबाईल क्रमांक 95039 22865 असा आहे.
शब्दांकन
वसंत रामचंद्र पोतदार
सोलापूर
मो. 9423065915
Post a Comment
0 Comments