मंगळवेढा/ विक्रांत पंडित
लोकसभा निवडणुकीमध्ये खासदारकीच्या रूपाने आपल्या सेवेची संधी द्या मग खासदार काय म्हणजे काय हे आपणास दाखवून देतो अशी साद भारतीय जनता पार्टी व महायुती यांच्यातर्फे सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून घोषित झालेले आमदार राम सातपुते यांनी पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या निवासस्थानी व जनसंपर्क कार्यालय मंगळवेढा येथे सदिच्छा भेट दिली असता उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना घातली आहे. गेल्या अनेक वर्षांच्या कालखंडामध्ये देशाच्या व राज्याच्या महत्वपूर्ण आणि सर्वोच्च पदावर सत्तेची फळे चाखणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसवाल्यांनी केवळ खुर्चीला चिकटून राहण्यामध्येच धन्यता मानली अशा मंडळींना आपणा सर्वांच्या आशीर्वादावर व पाठिंब्यावर आपण जोरदार टक्कर देण्यासाठी सज्ज असल्याचे आ सातपुते यांनी यावेळी बोलून दाखवले.
अनेक संतांच्या पदस्पर्शाने आणि अस्तित्वाने पुनीत झालेल्या पंढरपूर व मंगळवेढा भूमीतील जनतेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि वर्षानुवर्ष प्रलंबित असणाऱ्या प्रश्नांवर विकासाच्या माध्यमातून कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी येथील स्थानिक आमदार समाधान आवताडे यांनी भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या सहकार्यातून निधीचा अक्षरश:रतीब घातला आहे. या मतदारसंघातील विकासाची ही गंगा अखंडपणे पुढे चालू ठेवण्यासाठी आपण विविध विकास बाबींच्या रूपाने आपल्या सेवेसाठी उपलब्ध असेन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विकासाच्या बाबींपेक्षा घराणेशाहीचा वारसा असणाऱ्या एका राजकन्येला लोकशाहीची आणि जनतेची ताकद दाखवून देण्यासाठी संघर्षाच्या खाईतून निर्माण झालेल्या माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीने या निवडणुकीसाठी तिकीट देऊन आपल्या सेवेसाठी पाठवले आहे.
यावेळी भारतीय जनता पार्टी जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण यांनीही आपल्या मनोगतातून विरोधी पक्षाच्या उमेदवारावर जोरदार टीकेची झोड उठवत सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची कोणतेही देणेघेणे नसलेल्या उमेदवाराने आमदार राम सातपुते यांचे तिकीट जाहीर झाल्यानंतरच बोलण्यातून आपली हतबलता स्पष्ट केली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सिद्धेश्वर कोकरे यांनी आपले मनोगत व्यक्त करून आमदार राम सातपुते यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले आहे.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे, भाजपा पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष राजेंद्र सुरवसे, माजी व्हा चेअरमन अंबादास कुलकर्णी, माजी संचालक लक्ष्मण जगताप, सुरेश भाकरे, सचिन शिवशरण, बसवराज पाटील, रमेश भांजे, संतोष मोगले, दत्तात्रय जमदाडे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव, बादलसिंह ठाकूर, सुनिल डोके, युवराज शिंदे, सुनिल रत्नपारखी, दिगंबर यादव, डॉ शरद शिर्के, युवराज कोळी, चंद्रकांत जाधव, हरिभाऊ कोळी, जगन्नाथ रेवे, सचिन शिंदे, खंडू खंदारे, संजय माळी, सुशांत हजारे, अजित लेंडवे यांचेसह पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते, विविध गावांचे सरपंच आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments