पुन्हा एकदा
झाला महार पंढरीनाथ
मंगळवेढा /संतसूर्य वृत्तसेवा
एनसीडीसी कडून दामाजी कारखान्यास रुपये १०० कोटी मंजूर करुन आणलेबद्दल माजी आमदार श्री प्रशांत परिचारक यांचा दामाजी कारखाना संचालक मंडळाकडून सत्कार
संत दामाजी सहकारी साखर कारखाना हा आर्थिक अडचणीत होता.कारखान्यावर सुमारे २०० कोटीचे कर्ज होते.अशा परिस्थितीतही विद्यमान संचालक मंडळाने गेली दोन गाळप हंगाम यशस्वीरित्या पार पाडून शेतक-यांचा विश्वास संपादन केलेला आहे. कारखाना चालू करतेवेळी कारखान्याच्या जेष्ठ मार्गदर्शकांनी बँकांमार्फत दामाजी कारखान्यास आर्थिक मदत केली। याशिवाय जिल्हयाचे माजी आमदार श्री प्रशांत परिचारक यांनीही बँकेमार्फत कारखान्यास आर्थिक सहकार्य केले। कारखान्याने सर्वासाठी खुले सभासदत्व धोरण अवलंबिले. त्यास शेतक-यांनी भरघोस प्रतिसाद देवून रुपये दहा कोटीच्या वर कारखान्याकडे जमा झाले. दामाजी कारखान्यावर शेतक-यांनी दाखविलेला हा विश्वास आहे. विद्यमान संचालक मंडळाच्या कारभाराची साखर आयुक्तांनीही कौतुक करुन अभिनंदन केले आहे.शंभर टक्के एफआरपी कारखान्याने अदा केली असून वाहतूक बिले अदा केली आहेत. याशिवाय कामगारांचे पगार प्रत्येक महिण्याला वेळेवर केले आहेत.पाठीमागील कांही वर्षापूर्वीही दामाजी कारखाना आर्थिक अडचणीत होता. त्यावेळी स्व.सुधाकरपंत परिचारक यांनी पांडूरंग कारखान्याचा ऊस दामाजीस देवून दामाजीस सहकार्य केले होते. तिच परंपरा जिल्हयाचे माजी आमदार श्री प्रशांत परिचारक यांनी कायम ठेवली आहे.
एनसीडीसी मार्फत दामाजी कारखान्यास रुपये १०० कोटी कर्ज मंजूर करण्यासाठी श्री प्रशांत परिचारक यांनी परिश्रम घेवून पाठपूरावा केला. त्यामुळे दामाजीस कर्ज रुपये १०० कोटी मंजूर होवू शकले आहे. एनसीडीसी कर्ज मंजूरीमध्ये समाविष्ट असणारा सोलापूर जिल्हयामध्ये संत दामाजी कारखाना हा एकमेव कारखाना आहे. या कर्ज मंजूरीमुळे दामाजी कारखान्यास नवसंजीवनी मिळणार असल्याची माहिती चेअरमन श्री शिवानंद पाटील यांनी दिली. हे कर्ज मंजूर करण्यासाठी केलेल्या प्रयत्नासाठी संत दामाजी कारखान्याचे चेअरमन श्री शिवानंद यशवंत पाटील, व्हाईस चेअरमन श्री तानाजीभाऊ लक्ष्मण खरात तसेच संचालक मंडळाचे हस्ते श्री प्रशांत परिचारक यांचा सत्कार करण्यात आला. सदरचे कर्ज मंजूर करणेकामी राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री अजीत पवार, सहकारमंत्री श्री दिलीप वळसे-पाटील, पालकमंत्री श्री चंद्रकांत पाटील यांचे सहकार्य लाभल्याचे चेअरमन श्री शिवानंद पाटील म्हणाले सदर सत्कार प्रसंगी संचालक सर्वश्री मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणुकाका पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिध्द् लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर आदि उपस्थित होते
Post a Comment
0 Comments