Type Here to Get Search Results !

संतसूर्य

जिल्ह्यातील आमदार उपरा कसा ? - सुदर्शन यादव 

मंगळवेढा/संतसूर्य वृत्तसेवा

भाजपचे उमेदवार हे जिल्ह्यातील असून त्यांना उपरा ही टीका करून काँग्रेसवाले स्वतःचा नाकर्तेपणा लपवण्याचा प्रयत्न करत आहेत , जिल्ह्यातील आमदार उपरा कसा ? असा सवाल करत भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव यांनी आपले मत व्यक्त केले . पुढे बोलताना ते म्हणाले , 
   " भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार रामभाऊ सातपुते हे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभेचे आमदार असून ते जिल्ह्यातीलच आहेत तर मग ते उपरे कसे ठरतील ! काँग्रेस पक्ष कोणत्याही विकासाभिमुख मुद्द्यावर लढण्याकरता तयार नाही कारण त्यांच्याकडे एकही मुद्दा उरला नाही , त्यामुळे कुठून तरी उपरा म्हणून टीका करून निवडणूक लढवायची हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न दिसून येत आहे . खऱ्या अर्थानं ज्या काँग्रेसच्या उमेदवार गेली 15 वर्ष सोलापूर शहर मध्य च नेतृत्व करत आहेत त्यांचा आणि माळशिरसचे आमदार रामभाऊ सातपुते यांचा पाच वर्षाचा कालावधी बघितला तर सर्वाधिक काम राम सातपुते यांनी आपल्या मतदारसंघात केलेली आहेत . ज्या काँग्रेस नेत्यांना वाटत राम सातपुते मतदारसंघात फिरले नाहीत त्यांनी माळशिरस मध्ये जाऊन बघावं आज कोट्यावधी निधी आणून ते काम पूर्ण झालेली आहेत . सामान्य जनतेला वेगवेगळ्या आरोग्यदायी योजनांचा लाभ मिळवून देत त्यांना आरोग्य दूत म्हणून देखील संबोधलं जातं . अशा पद्धतीचे एक काम काँग्रेसच्या नेत्यांनी केलेले दाखवावं . लोकसभेच्या निवडणुकीचे मुद्दे हे देशाच्या विकासाचे असावेत , जनतेच्या भल्याचे असावेत , सोलापूरला वृद्धिंगत ठरणारे असावेत , पण फक्त उपरा उमेदवार म्हणून हिणवून मत मागण्याचं काम आज काँग्रेस पक्ष करत आहे . राम सातपुते हे विद्यार्थी चळवळीतून तयार झालेले नेतृत्व आहे आणि गेली पाच वर्ष त्यांनी माळशिरस मध्ये जनतेच्या भल्याची काम केलेली आहेत . नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून सबका साथ , सबका विकास , सबका विश्वास असं म्हणत आमचा प्रत्येक नेता पुढे येत आहे . संविधानाने सर्वांना अधिकार दिलेला आहे की कोणी कुठूनही निवडणूक लढू शकतो , मग आमच्या जिल्ह्यातील आमच्या आमदारांनी आमची लोकसभा लढवली तर काय बिघडत ? हा खऱ्या अर्थाने संविधानाचा अनादर नाही का ? काँग्रेसने आत्मपरीक्षण करावं आणि विकासाच्या मुद्द्यावर ती निवडणूक लढवावी . लहान मुलासारखं उपरा उपरा म्हणून पाय रगडत बसू नये . काँग्रेस वाल्याना दुसरा कोणताही मुद्दा आज दिसत नाही , कारण सर्व विकासाची काम नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली या देशभरामध्ये या महाराष्ट्रभरामध्ये आणि या जिल्हाभरामध्ये झालेली आहेत . काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी अनेक वर्ष सोलापूर जिल्ह्याचे नेतृत्व केलं पण त्यांच्या नेतृत्वामध्ये सोलापूर जिल्ह्याला कधी काही मिळालं नाही . ते स्वतः ऊर्जामंत्री असताना सुद्धा सोलापूर जिल्हा कायम अंधारात राहिला . स्वतः गृहमंत्री असताना देखील त्यांनी कोणतेही ठाम काम केलेलं नाही . म्हणूनच त्यांचा पराभव दोन टर्म या जनतेने केलेला आहे आणि आता तिसरी टर्म त्यांची मुलगी आमदार प्रणिती शिंदे उभारलेली आहे पण त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आपल्याला दिसत आहे , म्हणून कोणताही मुद्दा न घेता फक्त उपरा म्हणून हिणवण्यात त्यांना धन्यता वाटत आहे . पण जनतेने ठाम ठरवलेल आहे की जो विकास करेल त्यालाच आम्ही निवडून देऊ आणि विकासाचा एकही मुद्दा काँग्रेसकडे नाही त्यामुळे जनता ही भारतीय जनता पार्टी महायुतीच्या पाठीमागे ठामपणे उभारलेली आहे . " 
   असे मत त्यांनी व्यक्त केले .

Post a Comment

0 Comments