Type Here to Get Search Results !

संतसूर्य

अँड नंदकुमार पवार यांची सोलापूर जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी निवड जाहीर होणार
 मंगळवेढा / विक्रांत पंडित 


सोलापूर जिल्ह्याचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील वैयक्तिक कारणामुळे सध्या कार्यरत नाहीत .लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर जिल्हाध्यक्ष पद हे सक्रिय कार्यकर्त्याकडे असावे या हेतूने पक्षाने सोलापूर जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी मंगळवेढा चे माजी सभापती नंदकुमार पवार यांची निवड करण्याचा निर्णय घेतला असून त्यांची निवड सोमवार पर्यंत घोषित करण्याचे औपचारिकता राहिलेली आहे .नंदकुमार पवार हे मंगळवेढा तालुका पंचायत समितीचे सभापती म्हणून त्यांनी काम पाहिले आहे संत दामाजी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून त्यांनी काम करताना कारखान्याला चांगली उभारणी करून उजाळणी आणली होती महाविद्यालयीन जीवनापासून सक्रिय असल्यामुळे कायम संघर्ष करणे चळवळ करणे हे गुण त्यांच्या अंगीभुत आहेत मंगळवेढा सारख्या ग्रामीण भागात हॉटेल कामगारांची संघटना त्यांनी कार्यान्वित केली ते स्वतः उच्चशिक्षित असून वक्तृत्व कला चांगली आहे जिल्हाध्यक्ष पदाला ते चांगला न्याय देतील माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे ते खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात राजकारणाचा चांगला अभ्यास असून शेती, सामाजिक कार्य संस्कृती क्षेत्र, आर्थिक, वैद्यकीय, कला, वाणिज्य,    आधी सर्व क्षेत्रात रुची घेणारे व्यक्तिमत्व आहे. चांगला जनसंपर्क असून दांडगा अनुभव असल्यामुळे या पदाला नक्की न्याय मिळेल अशी परिस्थिती आहे यापूर्वी मंगळवेढा तालुक्यातील स्वर्गीय मनोहर सावजी यांना सोलापूर जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष पद काही काळापुरते मिळाले होते बऱ्याच वर्षानंतर काँग्रेस पक्षाने मंगळवेढा तालुक्याला न्याय दिला आहे लोकसभेच्या निवडणुकीत पवार वकील यांच्याकडे हे महत्त्वाचे पद आले आहे काँग्रेसच्या उमेदवाराला पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून मताधिक्य मिळवून देण्याबरोबर जिल्ह्यातील इतर मतदारसंघात सुद्धा चांगली संघटना उभा करून तरुणांपासून जेष्ठ कार्यकर्त्यापर्यंत सर्वांना सामावून घेऊन सर्वांना बरोबर घेऊन भाजप सारख्या शक्तिशाली पक्षविरुद्ध संघर्ष करण्यासाठी पवार वकील सक्षमपणे काम पाहतील असा विश्वास राजकीय निरीक्षकातून व्यक्त केला जात आहे.
Tags

Post a Comment

0 Comments