मंगळवेढा/विक्रांत पंडित
सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाकडून आज माळशिरसचे आमदार राम सातपुते यांची उमेदवारी जाहीर होणार आहे. अनेक दिवसापासून सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपा कडून कोण लढणार याबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती ढोबळे की बनसोडे पुन्हा महाराज अनेक नावांची चर्चा झाल्यानंतर आमदार राम सातपुते ,मिलिंद कांबळे यांच्या नावाची चर्चा होऊ लागली होती अगदी काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी सत्ताधारी पक्षाला उमेदवार मिळत नाही या शब्दात टीका देखील केली होती अशा परिस्थितीत आज भारतीय जनता पक्षाकडून आमदार राम सातपुते यांची उमेदवारी घोषित केली जाणार आहे .सोलापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये सहापैकी पाच मतदारसंघ भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षाचे आहेत या परिस्थितीत सोलापूरची जागा भाजपाचा उमेदवार निश्चित जिंकेल असा विश्वास व रणनीती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पक्षाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे असल्यामुळे या मतदारसंघातील उमेदवारी शेवटच्या टप्प्यापर्यंत संभ्रम अवस्थेत ठेवण्यास भारतीय जनता पक्षाला यश मिळाले आहे. प्रकाश आंबेडकर यांची वंचित आघाडी यांचे महाविकास आघाडी बरोबर सुर जुळणार नसल्याचे दिसत आहे. दरम्यान वंचित आघाडीने काँग्रेसच्या सात उमेदवारांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघ वंचित आघाडीची भूमिका महत्त्वपूर्ण राहणार आहे .प्रणिती शिंदे यांना वंचित आघाडीने पाठिंबा दिला तर प्रणिती शिंदे व राम सातपुते यांच्यात काटे की टक्कर अशी लढत होईल जर वंचित आघाडीने प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिला नाही तर निवडणूक रंगतदार अवस्थेत येईल परंतु निवडणुकीपूर्वीच निकालाची चिन्हे दिसू लागतील .अक्कलकोट मधून आमदार सचिन कल्याणशेट्टी, सोलापुरातून आमदार विजय देशमुख ,सुभाष देशमुख मोहोळ मधून राजन पाटील आमदार माने पंढरपूर मंगळवेढ्यातून प्रशांत परिचारक , आ.समाधान आवताडे अशी मातब्बर मंडळी राम सातपुते यांना विजयी करण्यासाठी जय्यत तयारी करत आहे या सर्वांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन होत असल्यामुळे आता राम सातपुते विरुद्ध प्रणिती शिंदे अशी निर्णायक लढत सोलापूर मतदारसंघात होत आहे. मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणाचा परिणाम या मतदारसंघावर किती होतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
मतदार संघामध्ये लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात आहे त्यानंतर दलित समाज धनगर समाज मराठा समाज यांचे मतदान कोणाकडे झुकणार यावर लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे आत्तापर्यंत हा मतदारसंघ सुशीलकुमार शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता त्यापूर्वी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता परंतु लिंगराज वल्ल्याळ, प्रतापसिंह मोहिते पाटील, शरद बनसोडे यांच्या पाठोपाठ डॉ. जयसिद्धेश्वर महाराज यांनी देखील या मतदारसंघात यश मिळवल्यामुळे गेल्या दहा वर्षात हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाकडे राहिला आहे आता भारतीय जनता पक्ष परत यशस्वी होणार की काँग्रेस पक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्या माध्यमातून परत या मतदारसंघावर आपले वर्चस्व निर्माण करणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Post a Comment
0 Comments