मंगळवेढा: महाराष्ट्र योग निसर्गोपचार महामंडळ कडून राज्य पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदी वैद्य बबन भोसले यांची निवड करण्यात आली. ही निवड महामंडळाचे राज्याध्यक्ष डाॅ.कृष्णदेव गिरी यांनी जाहीर केली.
वैद्य बबन भोसले व सौ.वैशाली भोसले हे उभयता पती पत्नी मंगळवेढ्यात गेली पंधरा वर्षापासून कृष्णा आयुर्वेद औषधालय व सुदा निसर्गोपचार केंद्र चालवतात. या केंद्रातून पंचक्रोशीतील रूग्णांना ते सेवा देत आहेत.
योग निसर्गोपचार, आयुर्वेदाच्या उपचार व प्रसारासाठी राज्य व राष्टीय स्तरावरील कार्यशाळा,शिबीरात ते मार्गदर्शन करतात.आयुर्वेदिक उपचार,मसाज,अंक्युप्रेशर,फिजिओथेरपी,चुंबकिय चिकित्सा,मातीलेप,न्युट्रीएशन आणि डाएटीशन यावर त्यांचा सखोल अभ्यास आहे.
वैद्य बबन भोसले यांचा या क्षेत्रातील अनुभव व कार्य लक्षात घेवून महाराष्ट योग निसर्गोपचार महामंडळ समितीने त्यांची सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी निवड केली आहे.
या यशाबद्दल रतनचंद शहा बॅंकेचे चेअरमन राहुल शहा,सॅप उद्योगसमूहाचे उद्योजक प्रसाद कुलकर्णी,जि.प.माजी सदस्या शैला गोडसे,मंगळवेढा पंचायत समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब शिंदे,आप्पाश्री प्रतिष्ठाण चे अध्यक्ष बांधकाम व्यावसायिक तानाजी जाधव,महाराष्ट राज्य अधिकारी संघटनेचे राज्याध्यक्ष डाॅ.विश्वनाथ शिंदे,जवाहरलाल हायस्कूलचे मुख्याध्यापक शंकर आवताडे, दामाजी एक्सप्रेसचे संपादक दिगंबर भगरे व एस.एस.सी.बॅच१९८७ च्या सर्व मित्र परिवाराने भोसले यांचे अभिनंदन केले.
Post a Comment
0 Comments