Type Here to Get Search Results !

संतसूर्य


        "" पक्षांची नवीन परीक्षा ""
               - - - - - - - - - - -

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील महाराष्ट्रातील राजकीय पक्षांचे , निकालांचे अंदाज - आराखडे बांधताना गत २०१९ च्या निवडणुकातील निकालांमध्ये त्या त्या पक्षांना मिळालेली एकूण मते , मतदार संघ निहाय मते , आणि मतांची टक्केवारी लक्षात घेणे अनिवारय वा महत्वाचे असते .
परंतू , २०२४ च्या लोक्सभा निवडणुकांचे असे अंदाज बांधणे एकतर चुकीचे ठरेलं अथवा ते पूर्णंशाने बरोबर ठरणार नाही .
२०१९ च्या निवडणुकात , मग त्या लोकसभेच्या असोत किंवा विधानसभेच्या , महाराष्ट्रातील सगळ्याचं पक्षांचा , इतिहास म्हणा वा भूगोल , गत दोन वर्षात अमूलाग्रपणे बदलून गेला .
सगळ्या पक्षांची दोन दोन छकले झाली . पक्ष विभागले गेले . भाजपा मध्ये पक्षीय , पदाधिकारी आणी त्या अनुषंगाने कार्यकर्त्यांचे ध्रुवीकरण साधले गेले . तर इतर पक्षांमध्ये विकेंद्रीकरण झाले .
मागील निवडणुकीमध्ये भाजपा - शिवसेना हे पक्ष युती म्हणून एकत्र लढले . नंतर त्यांचे वेगवेगळे दोन पक्ष स्वतंत्रपणे राजकीय विचार करते झाले . शिवसेनेची दुफळी होऊन दोन स्वतंत्र सेना अस्तित्वात आल्या . राष्ट्रवादी काँग्रेस फुटून दोन वेगवेगळ्या राष्ट्रवादी अस्तित्वात आल्या . काँग्रेस चे विभाजन जरी झाला नाही तरी तिला बेरजेचे राजकारण करता आले नाही . त्यातील बरेचसे गयाराम इतस्ततः 
पान्गले . वंचित बहुजन आघाडी आणी एमआयएम सध्या स्वतंत्रपणे आपापले नशीब स्वबळावर आजमावताहेत . जानकरांचा रासप आणी शेट्टी ची शेतकरी संघटना यांची स्थिती ही काही वेगळी नाही . सुरुवातीचे माफक यश सोडले तर मनसे कधी अंधारात तर कधी दिवसा उजेडी चाचपडत आहे .
लोकसभा २०१९ च्या निवडणुकीत भाजपा ला २७.८४ % मते मिळाली . तर शिवसेनेला २३.५ % . अर्थात ही या दोन्ही पक्षांची एकत्रित सर्मिसळ झालेली मिळून एकंदर मते होती . राष्ट्रवादी काँग्रेस ला १५.६६ % मते मिळाली . वंचित आणि इमआयएम ला मिळून ६.९२ %/ मते मिळाली .
आताच्या म्हणजे २०२४ च्या बदललेल्या परिस्थिती मध्ये , महा युतीतील आणी महा आघाडीतील कोणत्या पक्षाला अथवा गटाला , किंवा स्वतंत्र लहान सहान पक्षाला वा गटाला किती मते मिळतील ? त्यांचा आवाज ,ताकद आणि औकात किती असेल ? कुणाचा जनाधार किती किंवा कोण - किती आघाडीवर - पिछाडीवर असेल ? याचा अंदाज बांधणे हे आताच्या घडीला केवळ आणि केवळ अशक्य आहे ? हा अंदाज वर्तवणे कर्मकठीण आहे .
निवडणूक आयोगा ने आणि विधानसभा अध्यक्षांनी काही निकाल दिलेला असला तरी मूळ पक्ष कोणते आणि त्यांची निवडणूक चिन्हे योग्य की अयोग्य याचा निवाडा मतदार राजा हाच खरा न्यायाधीश बनून करेल आणि तो आपल्या सर्वांना कळेल ते ४ जून २०२४ ला .
तिच तर या येत्या निवडणुकीतले औस्तुक्य आहे आणि गंमत ही ! तशीच ती आहे सगळ्या पक्षांची नव्याने होणारी परीक्षा ही !

                   - - - प्रमोद पाटील
                         पार्क ग्रंडिअर 
                बालेवाडी‌ हाय स्ट्रीट 
                                     पुणे 
                    ८३२९५४४५२२

Post a Comment

0 Comments