सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी आमदार राम सातपुते यांच्या नावाची भाजपा करणार औपचारिक घोषणा
मंगळवेढा/ विक्रांत पंडित
सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाकडून माळशिरसचे आमदार राम सातपुते यांच्या नावाची घोषणा करण्याची औपचारिकता राहिली आहे. राम सातपुते हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खंदे समर्थक असून विद्यार्थी परिषदेपासून चळवळीत काम करणारे कार्यकर्ते आहेत. माळशिरस मतदारसंघांमध्ये त्यांनी चांगले काम उभा करून संघटन कौशल्याचे आधारे तालुक्यात भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात निर्माण केली . केवळ भाजप स्वतःच्या ताकदीवर माळशिरस मतदारसंघ जिंकू शकेल अशी ताकद निर्माण केली असल्यामुळे आमदार राम सातपुते यांना येणारे विधानसभा लढवण्याची इच्छा होती .परंतु पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे अखेर हो हो ना ना करत आमदार राम सातपुते सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास तयार झाले आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये केवळ एका मतदारसंघात आमदार प्रणितीताई शिंदे या काँग्रेस पक्षाकडून आमदार झालेले आहेत .बाकी सर्व ठिकाणी भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षाचे आमदार असल्यामुळे ही निवडणूक भारतीय जनता पक्षाला सहज जिंकता येईल असे वाटत आहे .सध्या काँग्रेस पक्षाची ताकद कमी झालेली आहे .शिवसेना ,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार व उद्धव ठाकरे यांचे समर्थक यांची ताकद पाहता ही निवडणूक वर करणे पाहत असता आमदार राम सातपुते यांना सोपी वाटत आहे परंतु सोलापूर जिल्हा हा पूर्वीपासून काँग्रेस प्रेमी आहे जनतेमध्ये आमदार प्रणिती शिंदे मतदारसंघातील प्रश्न कोणत्या पद्धतीने राजकीय दृष्ट्या पेटवून वातावरण निर्मिती करण्यात यशस्वी ठरतील. त्यावर निवडणुकीची रंगत वाढत जाणार आहे काँग्रेस संस्कृती प्रमाणे निवडणूक लढवली तर प्रणिती शिंदे यांना निवडणूक जड जाणार आहे. परंतु त्याचवेळी भारतीय जनता पक्षामध्ये सत्ता ताकद असल्यामुळे कार्यकर्त्यांना किती किंमत दिली जाईल कार्यकर्त्यांना कसे सामावून घेतले जाईल याशिवाय विधानसभेच्या निवडणुकीची पार्श्वभूमी भारतीय जनता पक्षामधील लोकप्रतिनिधीमध्ये असलेली गटबाजी ही कदाचित आमदार राम सातपुते यांना पराभवासाठी कारणीभूत ठरू नये अशी शंका राजकीय निरीक्षकातून व्यक्त केली जात आहे. भारतीय जनता पक्षामध्ये शिस्त असली तरी भविष्याचा अंदाज घेता विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला यश मिळाले पाहिजे संधी मिळाली पाहिजे यासाठी भारतीय जनता पक्षात काँग्रेसपेक्षा वाईट गटबाजी आहे प्रत्यक्ष गटबाजी व पक्षाची ध्येयधोरणे पक्षाचे नियंत्रण व आमदार राम सातपुते यांना विजयी करण्यासाठी शेवटपर्यंत कष्ट घेणे यात भारतीय जनता पक्ष यशस्वी ठरेल परंतु नकळत संधी मिळाली तर गटबाजी मात्र विजयाचा गळा घोटण्यास कमी पडणार नाही.
Post a Comment
0 Comments