मंगळवेढा संतसूर्य वृत्तसेवा
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राईनपाडा हत्याकांड प्रकरणात उत्कृष्ट विशेष सरकारी वकील म्हणून चोख कामगिरी बजवल्याबद्दल
ऍड उज्वल निकम साहेब यांचा आज मंगळवेढ्यात भव्य नागरिक सत्कार आयोजित करण्यात आला आहे .आज रविवारी लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार असल्याचे संयोजक अखिल भारतीय विमुक्त जाती संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मच्छिंद्र भोसले यांनी सांगितले .या कार्यक्रमाला आमदार समाधान आवताडे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे ,धनश्री परिवाराचे प्रमुख शिवाजीराव काळुंगे, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार वकील, रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा ,वसंतनाना देशमुख ,ज्ञानदेव जावीर, भालचंद्र पटवर्धन वकील, भारत पवार वकील, वडार समाजाचे राज्याचे नेते डी टी पवार, दौलतनाना शितोळे, विजय खवतोडे ,संजय कट्टे, अरुण जाधव, राजू अवताडे ,राहुल मोरे, हैदर केंगार ,बबन डावरे ,उल्हास माने वकील ,भीमराव बंडगर, लक्ष्मण गायकवाड ,सुरेश पवार ,धनंजय हजारे वकील ,दिगंबर भगरे ,सोमनाथ माळी मारुती शिंदे, भैरू भोसले ,नामदेव इंगोले ,महादेव धोत्रे ,विष्णु शिंदे, पांडुरंग जावळे ,दोडके सर ,राजू भोसले ,जनाबाई इंगोले, मारुती भोसले, जयप्रकाश भोसले वकील मुंबई ,महादेव भोसले, सुनील सर्वगोड, भारत जाधव ,सुभाष चव्हाण, बिराप्पा बंडगे ,श्रीमंत चव्हाण ,अशोक चव्हाण, दिगंबर माळवे आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून भटक्या विमुक्त जाती संघ मुंबई, नाथपंथी डवरी गोसावी समाज संघटना, मंगळवेढा तालुका समस्त मंगळवेढेकर नागरिक, वकील संघ मंगळवेढा यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे .या कार्यक्रमाला मंगळवेढा शहर व ग्रामीण भागातील जनतेने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे
Post a Comment
0 Comments