देवेंद्र फडणवीस यांनी केला आपला शब्द पूर्ण
मंगळवेढा विक्रांत पंडित
मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील दुष्काळग्रस्त 24 गावांना शेतीचे पाणी मिळावे यासाठी आमदार समाधानदादा अवताडे यांनी आपले राजकीय कसब पूर्णपणे पणाला लावले असून आज काही क्षणात मंत्रिमंडळाच्या बैठकीत या 24 गाव पाणी योजनेला मंजुरी मिळणार आहे यामुळे या भागातील जनतेत जनतेला शेतकऱ्यांना शेतीला पाणी मिळणार असल्याचा आनंद द्विगुणीत होणार आहे स्वातंत्र्यपूर्व काळापासून दुष्काळग्रस्त असलेल्या पाण्यापासून वंचित असलेल्या या भागातील शेतकऱ्यांना येत्या काही काळात मंजुरीचे गोड बातमी मिळणार आहे त्या पाठोपाठ हे काम देखील लवकर सुरू होऊन शेतकऱ्यांच्या शेतात पाणी येणार आहे बंदिस्त पाईपलाईन द्वारे काम होणार असल्यामुळे काम देखील कमी वेळेत व अधिक दर्जेदार होण्याची शक्यता अधिक आहे गुंजेगाव येथील मान नदीतून पाणी उचलून लेंडवे चिंचोली येथे नेऊन तेथून हे सर्व पाणी दुष्काळी 24 गावाला दिले जाणार आहे आत्तापर्यंत अनेक लोकप्रतिनिधींनी या पाण्यासाठी प्रयत्न केले परंतु प्रत्यक्ष पाणी मिळवून देण्यासाठी मिळणारी मंजुरी मिळवण्याचा प्रयत्न आमदार समाधान दादा अवताडे यांनी केला त्यांच्या प्रयत्नाला काही क्षणात आता मंजुरी मिळत आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोटनिवडणुकीत शब्द दिला होत अखेर हा शब्द पूर्ण केला आहे.
Post a Comment
0 Comments