Type Here to Get Search Results !

संतसूर्य

सचिन बबन सुरवसे या युवक शेतकऱ्याने तीस एकर क्षेत्रात 300 क्विंटल केले करडीचे उत्पादन
 मंगळवेढा / विक्रांत पंडित 

मंगळवेढा तालुक्यामध्ये ज्वारी करडई उत्पादनाबाबत शेतकरी महाराष्ट्रात ओळखला जातो मंगळवेढ्यातील युवक शेतकरी सचिन बबन सुरवसे याने अवघ्या 30 एकर क्षेत्रामध्ये 300 क्विंटल करडईचे उत्पादन केले आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने आदर्शवत शेती करून करडीचे उत्पादन केल्याबद्दल त्याचे प्रगतशील शेतकरी  तुकाराम नागणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सचिव वाकडे साहेब, किल्लेदार पेंट कंपनीचे संचालक अरुणअण्णा किल्लेदार यांनी त्याचा फेटा बांधून पुष्पहार घालून सत्कार केला आहे .सचिन सुरवसे यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेत असताना अधिक कष्ट घेतले आहे .कोणतेही काम करताना न लाजता प्रामाणिकपणे  काम करण्याची सवय असल्यामुळे त्याने आपल्या वडिलोपार्जित शेतीमध्ये मनापासून काम करून चांगल्या पद्धतीने आदर्शवत अशी शेती केली .यामध्ये सुमारे 30 एकर क्षेत्रामध्ये 300 क्विंटल करडईचे उत्पादन घेतले आहे यामुळे सचिन सुरवसे यांचे मंगळवेढा तालुक्यासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून कौतुक केले जात आहे. आमदार समाधानदादा अवताडे , धनश्री परिवाराचे प्रमुख प्रा शिवाजीराव काळुंगे,माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे,डीसीसी बँकेचे संचालक बबनराव अवताडे,बाजार समितीचे सभापती सुशील अवताडे, माजी सभापती सोमनाथ आवताडे, सत्यजित सुरवसे, प्रतीक किल्लेदार, सजग नागरिक संघाचे संजय कट्टे पाटील, ज्ञानदेव जावीर आदी नी त्याचे अभिनंदन केले आहे 

Post a Comment

0 Comments