आ प्रणितीताई शिंदेना भासणार मारवाडी वकील, रतिलाल शेठजी, भारत भालके यांची उणीव,तर आ.प्रशांत परिचारक,आ. समाधान आवताडे, लक्ष्मण ढोबळे यांचा होणार त्रास
मंगळवेढा /विक्रांत पंडित
सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा पत्ता नसल्यामुळे काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार आमदार प्रणितीताई शिंदे यांनी मंगळवेढा तालुक्यातून गाव भेट दौरा सुरू करून निवडणूक जिंकण्याची तयारी सुरू केली आहे .यापूर्वी उज्वलाताई शिंदे, सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला असला तरी मंगळवेढा तालुक्याने काँग्रेसला व शिंदे परिवाराला कायम उजवे योगदान दिले आहे. मात्र यावेळी या मतदारसंघात स्वतः शिंदे वगळता सर्व लोकप्रतिनिधी त्यांच्या विरोधात आहेत इतकेच नव्हे तर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात शिंदे कुटुंबाला परिवाराला निवडणूक काळात मतदान करणारे परिचारक, भालके कुटुंब देखील त्यांच्याबरोबर असणार नसल्याचे दिसत आहे. 2019 या निवडणुकीत भारत भालके यांनी नाममात्र का होईना आघाडी मिळवून दिली होती. दुर्दैवाने भारत भालके यांचे निधन झाले असून त्यांचे चिरंजीव भगीरथ भालके हे तेलंगणातील बी आर एस या पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख नेते आहेत .यामुळे प्रणिती ताई शिंदे यांना मंगळवेढा तालुक्यामध्ये आता स्वर्गीय मारवाडी वकील, रतनचंद शहा, भारत भालके यांची उणीव जाणवणार असून माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे ,माजी आमदार प्रशांतराव परिचारक ,आमदार समाधान आवताडे, बीआरएस चे भगीरथ भालके हे काँग्रेसच्या विरोधात राहणार आहेत. यामध्ये भगीरथ भालके वगळता बाकीचे सर्व नेते स्पष्ट विरोधात असल्यामुळे आमदार प्रणिती शिंदे यांना मंगळवेढा तालुक्यातून मताधिक्की मिळवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा करावी लागणार आहे .यापूर्वी सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री, अर्थमंत्री ,केंद्रीय मंत्री, राज्यपाल आदी महत्त्वाच्या पदावर होते. त्यांच्या काळात 35 गाव पाणी योजनेला निधी मिळाला नाही यामुळे ग्रामीण भागातील दुष्काळी भागातील जनतेने शिंदे यांना दोन निवडणुकीत दोन्ही पछाड केले होते .मात्र सत्ताधारी भाजपकडून देखील या प्रश्नाबाबत उदासीनता दाखवली गेली आहे.जत , सांगोला तालुक्याला निधी मिळाला परंतु मंगळवेढा तालुक्याला अद्याप मंजुरी देखील मिळाली नाही ,मग निधी कधी मिळणार, काम कधी होणार, पाणी कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. कर्नाटक राज्यात जाण्याची भाषा होत आहे.अशा परिस्थितीत या निवडणुकीत आमदार प्रणिती शिंदे यांना पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात मताधिक्य मिळणे आजमीति ला अवघड असल्याचे स्पष्ट दिसत आहे. इतकेच नव्हे तर मोहोळ मतदार संघात देखील त्यांच्यासमोर मोठी समस्या आहे. मोहोळ कायम शिंदे यांना फॉर राहिलेला आहे.सोलापूर मतदारसंघात त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघाबरोबर इतर पाच विधानसभा मतदारसंघात देखील त्यांच्यासमोर मोठे आव्हाने उभे आहेत .राजकीय परिस्थिती सकारात्मक असल्यानंतर, राजकीय पाठबळ असल्यानंतर निवडणूक जिंकणे सोपे जाते. परंतु आज शासन विरोधात आहे, मतदारसंघातील लोकप्रतिनिधी विरोधात आहेत.
कांग्रेस चे राजकीय नेते, कार्यकर्ते यांची फळी मर्यादित आहे स्वतः काँग्रेस पक्ष अत्यंत अडचणीत व मर्यादित झालेला आहे या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे असलेले कार्यकर्ते मावळे, शिवसेना उबाठा गटाचे सैनिक, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे योध्ये या सर्वांची मोट बांधून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात मताधिक्य मिळवणे अवघड असल्याचे दिसत आहे परंतु आत्तापर्यंतचा सुशीलकुमार शिंदे यांचा अनुभव ,आमदार प्रणिती शिंदे यांचे राजकीय कसब यामध्ये मतदारांना ते कशाप्रकारे आपलेसे करून आपल्या मर्यादित कार्यकर्त्यांना योग्य पद्धतीने काम सांगून त्यांच्याकडून चांगल्या पद्धतीचे काम करून घेऊन मताधिक्य मिळवून कसे विजयी होतील याकडे संपूर्ण राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागलेले आहे. आज मीतिला सोलापूर लोकसभा मतदारसंघात आमदार प्रणिती शिंदे या उमेदवार म्हणून तुल्यबळ आहेत .त्यांची प्रतिमा आहे. काम आहे. सुसंस्कृत असून मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचा आश्वासन चेहरा म्हणून त्या प्रबळ दिसत आहेत.तरुण वर्ग त्या आकर्षकशीत करून , बेकारी ल फुंकर घालून वातावरण तापवू शकतील. आई बाबा चे पराभवाचे उट्टे काढणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांच्यासमोर भारतीय जनता पक्ष कोणाला उमेदवारी देणार याबद्दल मतदारसंघात प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली आहे .माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, यांच्या कन्या कोमल ढोबळे, माजी खासदार अमर साबळे, आमदार राम सातपुते , शरद बनसोडे यांची नावे चर्चेत आहेत .आमदार विजयकुमार देशमुख यांचा देखील जातीचा लीगल दाखला निघाला असल्याचे सांगितले जात आहे. परंतु ते स्वतः राखीव जागेवर निवडणूक लढवण्यास तयार नाहीत अशा परिस्थितीत भारतीय जनता पक्षाकडून कोण उमेदवार असेल याबद्दल उत्सुकता निर्माण झालेली आहे. या पार्श्वभूमीवर मतदारसंघाबाहेरील उमेदवार पार्सल म्हणून आमदार प्रणिती शिंदे मतदारसंघात प्रचाराची राळ उठवून काही आक्रमकपणा आणून निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न करू शकतील .सोलापूरची विमान सेवा असो, सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी असो, बेरोजगारी असो, जिल्ह्याचा विकास असो जिल्ह्याच्या राजकीय प्रगतीमध्ये भारतीय जनता पक्षाने मंत्रीपद निर्णय दिल्यामुळे नेते व कार्यकर्ते समर्थक व जनतेत असलेला असंतोष या सर्व असंतोषाला आमदार प्रणिती शिंदे किती मोठ्या प्रमाणात खत पाणी घालणार यावर त्यांचे यश अवलंबून राहणार आहे.
विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांची पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ तरुणांमध्ये क्रेझ आहे या क्रेझ च आमदार प्रणिती ताई शिंदे यांना किती लाभ होणार हे या लोकसभेच्या निवडणुकीत दिसून येणार आहे. अभिजीत पाटील यांचा पंढरपूर शहर व दोन जिल्हा परिषद गट तर मंगळवेढा तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचे प्रांतिक सदस्य रतनचंद शहा सहकारी बँकेचे चेअरमन राहुल शहा यांची ताकद या निवडणुकीत आजमावून पाहता येणार आहे पाटील व शहा यांच्या राजकीय ताकदीवर विधानसभेच्या निवडणुकीची समीकरणे व सूत्रे बदलली जाणार आहेत.
माजी आमदार नरसय्या अडम हे महाविकास आघाडीमध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या आदेशाने सहभागी झाले तर आमदार प्रणिती शिंदे आपला मतदारसंघ अडम यांना देऊन लोकसभेला त्यांच्याकडून मोठे मताधिक्य मिळवू शकतात .असाही फायदा आमदार प्रणिती शिंदे यांनी करून घेतला तर त्यांना लोकसभेच्या निवडणुकीत वावटळीत दिवा लावता येणार आहे.
Post a Comment
0 Comments