Type Here to Get Search Results !

संतसूर्य

मंगळवेढा तालुक्यात शेतकरी, नेते कार्यकर्ते यांना हक्काच्या पाण्यासाठी संघर्षाची जागृती करून देणारे व्यक्तिमत्व एस डी पाटील  विसावले 
मंगळवेढा /विक्रांत पंडित

 मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी भागाला पाणी मिळावे यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी राजकीय नेत्यात व कार्यकर्त्यात जनजागृती करून देणारी व्यक्तिमत्व म्हणजे यासाठी एस डी पाटील. मंगळवेढा तालुक्यातील मुंढेवाडीतील एस .डी .पाटील यांनी आपल्या शिक्षणाचा ज्ञानाचा पुरेपूर वापर करून तालुक्यात पाण्यासाठी चळवळ उभा करणाऱ्या मध्ये मोठे योगदान दिले आहे त्यांनी आपल्या अभियांत्रिकी ज्ञानाचा वापर करून सह्याद्री पर्वतावर पडणारे पाणी समुद्राकडे जाऊन वाया जाते हे पाणी दुष्काळी सोलापूर , धाराशिव जिल्ह्याला मराठवाड्याला आणता येते यामध्ये आटपाडी सांगोला मंगळवेढा जत या भागात देखील कमी खर्चात पाणी मिळू शकते हे शंकर पाटील यांनी नकाशा काढून अभियांत्रिकी ज्ञानातून अत्यंत कमी खर्चात कसे करता येते हे दाखवून दिले होते इतकेच नव्हे तर त्यांनी तालुक्यातील राजकीय नेते व कार्यकर्त्यांना या पाण्यासाठी चळवळ करण्यासाठी प्रवृत्त केले. पुढे हीच मंडळी ना नागनाथ अण्णा नाईकवाडी यांच्या चळवळीत सहभागी झाली तालुक्यात पाण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये सर्वसामान्य जनतेमध्ये राजकीय नेते कार्यकर्ते यांच्यामध्ये उठाव करण्यासाठी जे प्रयत्न केले होते ते प्रयत्न शंकर पाटील यांनी केले होते पाणी प्रश्नासाठी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्यापासून नंदकुमार पवार शिवाजीराव काळुंगे     जकराया शुगरचे बी बी जाधव वकील  दामोदर देशमुख, भारत पवार यांच्यासह अनेकांनी एस डी पाटील यांचे मार्गदर्शन घेतले यांच्याकडून माहिती समजून घेतली आणि मंगळवेढा तालुक्यात पाण्यासाठी चळवळ उभा केली .त्या काळात होणाऱ्या चळवळी त्या काळात होणारी आंदोलने ही प्रामाणिक हेतूची आंदोलन होते मात्र गेल्या पंचवीस वर्षात पाणी आणण्यासाठी नव्हे तर राजकीय करिअर घडवण्यासाठी राजकीय पदे मिळवण्यासाठी दुष्काळी पाण्याचा भांडवल म्हणून वापर केला गेला यामुळे 35 गावच्या पाण्याच्या शिडी वर चढून अनेक जण संचालक चेअरमन आमदार झाले मंत्री झाले राज्यपाल झाले केंद्रीय मंत्री झाले
चाळीस ते पन्नास वर्षे झाले या दक्षिणेतील दुष्काळी भागाला पाणी मिळू शकले नाही 40 धोंडा ,तेलधोंडा गद्या गाढव , दोड्डा नाला अशा अनेक योजना अनेक ओढे नाले अनेक माध्यम प्रकल्प वेगवेगळ्या नावाने पुढे आले पूर्व भागातील उजनीचे शिल्लक पाणी दक्षिण भागात देण्यासाठी प्रयत्न केले गेले परंतु पूर्वी कडील शेतकरी अज्ञानात ठेवून त्यांच्या हक्काचे पाणी काढून घेऊन दक्षिणेत नेण्याचा प्रयत्न चालू आहे भविष्यात भीमा नदीच्या पात्रात पाणी उपलब्ध न झाल्यास नदीकाठच्या शेतकऱ्यांची परिस्थिती दुष्काळी 35 गावातील जनतेपेक्षा अधिक वाईट होणार आहे परंतु खरे सांगितल्यानंतर समजून घेण्याचे वस्तुस्थिती मान्य करण्याची मानसिकता कोणाचीच नसल्यामुळे अनेकांना वारंवार खोटे सांगितलेले खरे सत्य प्रमाण वाटते तब्बल 40 50 वर्षे संघर्ष करून ज्यांनी पाण्यासाठी वेळ दिला त्यापेक्षा काल परवा चळवळ करून कर्नाटकात जातो म्हणून धमकी देणारे कार्यकर्ते नेते अधिक प्रगल्भ झाले असल्या सारखे सांगत आहेत
तालुक्यात पाणी मिळावे यासाठी प्रयत्न करणाऱ्या  त्या मंडळींच्या त्यागामुळे प्रयत्न मुळे उजनीचे पाणी आले म्हैसाळचे पाणी आले शेवटी प्रयत्न करणारा ला यश मिळते मंगळवेढा तालुक्याला हक्काचे पाणी देण्याचा प्रयत्न घोषणा अभिवचन केंद्रीय नेते शरद पवार यांनी दिले होते त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून वीस वर्षाच्या वेळा ढोबळे यांना आमदार केले गेले. पवार यांच्या शब्दावर विश्वास ठेवून ढोबळे ना आमदार चार वेळा केले.परंतु शरद पवार व काँग्रेस सरकार  पाणी दिले नाही.कांग्रेस सरकार गेल्यानंतर युती शासनाच्या काळात गोपीनाथ मुंडे यांनी कृष्णा खोरे महामंडळ या काळात अशक्यप्रय असे पाणी मंगळवेढा तालुक्यात आणून दिले कोट्यावधी रुपयाचा निधी उपलब्ध करून रात्रंदिवस कामे केली जात होती त्यानंतर सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांनी केंद्रातून एआयबीपी निधीतून म्हैसाळ योजनेसाठी निधी आणला या निधीतून जत मंगळवेढा पर्यंत कामे झाली जत मधील शेवटच्या टोकाला पाणी मिळण्यापूर्वी मंगळवेढा तालुक्यात १४ गावाला पाणी मिळाले आहे ही वस्तुस्थिती आहे परंतु पाण्यासाठी कर्नाटकात जातो म्हणणे ठराव काय करणे चमकोगिरी करणे असे अनेक प्रकार अलीकडच्या काळात घडू लागले आहेत बेलगाम  निपाणी चे दुःख या मंडळींनी पाहून यावे. तालुक्याने 2000 पर्यंत पाण्यासाठी संघर्ष चळवळ पाहिली. 2000 साला नंतर तालुक्यात पाण्यासाठी आंदोलन झाले नाही. राजकिय  पाण्याची आंदोलने झाली.अनेक निवडणुका झाल्या अनेक पाणीदार आमदार झाले परंतु 35 गाव योजना असो की 24 गाव योजना असो या योजनेला अद्याप महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाने मान्यता दिली नाही मान्यता मिळाल्याशिवाय या योजनेचे हेड तयार होत नाही हेड नसल्यामुळे अर्थसंकल्पात तरतूद करून निधी टाकता येत नाही. पृथ्वीराज चव्हाण असून की देवेंद्र फडणवीस असो यांनी या योजनेसाठी अद्याप मंत्रिमंडळातून मान्यता दिली नसल्यामुळे 35 गाव की 24 गाव या योजनेसाठी आत्तापर्यंत एक रुपया खर्च झालेला नाही माहितीपेक्षा अधिक ज्ञान असल्यामुळे अनेक चळवळ करणारे नेते कार्यकर्ते माननदीला कालव्याचा दर्जा डॉ. राम साळे यांनी मिळवून दिला असे जाहीर सांगतात परंतु या माननदीत कालव्याद्वारे कधीही पाणी दिले जात नाही ज्यादा झालेले पाणी, पावसाळ्यात जादा झालेले पाणी सोडले जाते परंतु कालव्याचा दर्जा दिल्यानंतर पाणी वाटप करताना ठरल्याप्रमाणे जे पाणी दिले गेले पाहिजे ते दिले जात नाही यापेक्षा अधिक दुर्दैव काय परंतु काळ वेळ बदलत जाते लक्ष्मण ढोबळे यांनी आमदारकीच्या काळात तोंडले बोडलेपर्यंत थांबलेले पाणी मंगळवेढा तालुक्यात आणले मंगळवेढा तालुक्यात तब्बल 15 किलोमीटर पर्यंत कालव्याची लांबी वाढवली तालुक्याला पाणी मिळवून दिले.   वीस वर्षात पाणी आणतो म्हणून थापा मारल्या अशी जाहीर टीका आवर्जून ढोबळे वर केली जाते. आमदार समाधान आवताडे यांनी देखील म्हैसाळचे पाणी अशक्य असे पाणी माननदीत आणून चांगले काम करून दाखवते आहे परंतु 24 गावाला निधी आणणे पाणी आणल्याशिवाय त्यांची देखील यातून सुटका होणार नाही आमदार भारत भालके यांनी अकरा ते बारा वर्षाच्या काळात पाण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला पूर्व भागातील शिल्लक पाणी दक्षिण भागात देण्यासाठी आग्रह केला वाल्मी समितीच्या अहवालानुसार तिकडचे पाणी इकडे देण्यास सहमती मिळवली परंतु राज्य शासनाने विदर्भ अनुशेष असल्यामुळे ही योजना तेव्हापासून आत्तापर्यंत मंजूर केली नाही योजना मंजूर नाही प्रशासकीय मंजुरी नाही यामुळे अर्थसंकल्पात तरतूद होत नाही परंतु अभ्यासक अधिक अभ्यास करून आपले मत व्यक्त करत असल्यामुळे अनेकांना आपण काय वाचतो आणि आपण काय वाचले आता काय समजावे हे समजत नाही अशा परिस्थितीत 24 गावची पाणी योजना अडकलेली आहे जोपर्यंत या योजनेला प्रशासकीय पातळीवरील सर्व मान्यता मिळत नाहीत तोपर्यंत मंत्रिमंडळाची मान्यता मिळत नाही त्यानंतरच या योजनेला निधी देता येणार आहे आता अर्थसंकल्पातच तरतूद केल्यानंतर निधी देता येतो असे दिवस राहिले नाहीत बजेट अधिवेशन नंतर देखील मान्यता मिळाल्यावर पुरवणीमध्ये या योजनेसाठी निधी मिळू शकतो आमदार समाधान आवताडे हे प्रयत्नवादी आशावादी असे आहेत नव्हे तर ते करून आणणारे आहेत महायुतीचे सरकारच पंढरपूर मधील निकालामुळे निर्मितीला आलेले आहे यामुळे 24 गाव पाणी योजनेला महायुती शासनाच्या काळातच मंजुरी व निधी निश्चित मिळेल अशी आशादायक चित्रे सध्या मंत्रालयात व जलसंधारण खात्यामध्ये दिसत आहेत शेवटी मंगळवेढा तालुका दुष्काळातून बाहेर पडावा सर्व शेतकऱ्याला पाणी मिळावे यासाठी एसडी पाटील यांनी केलेल्या प्रयत्नाला या पुढील काळात देखील पाठपुरावा करावा लागणार आहे हा पाठपुरावा करूनच तालुक्याला पाणी द्यावे लागणार आहे तालुक्याला पाणी मिळावे तालुक्याला पाणी मिळाल्यानंतरच पाटील यांना खरी श्रद्धांजली मिळणार आहे यासाठी भूमिपुत्र काय असतो हे समजून घेण्यासाठी परत एकदा एस डी पाटील यांना पाण्यासाठी प्रयत्न करणारांनी समजून घ्यावे  हीच श्रद्धांजली

Post a Comment

0 Comments