Type Here to Get Search Results !

संतसूर्य

सजग नागरिक संघाच्या हाकेला आमदार समाधान आवताडे यांच्याकडून जोरदार प्रतिसाद
प्राथमिक शाळेच्या इमारत व सुविधेसाठी साडेतीन कोटी रुपयांचा निधी प्रत्यक्ष काम सुरू
मंगळवेढा/विक्रांत पंडित

मंगळवेढा शहरातील प्राथमिक शाळेच्या इमारती प्राथमिक सुविधा व तालुक्यातील आरोग्य या हेतूने मंगळवेढा सजग नागरिक संघाने काम सुरू केले होते .आमदार समाधानदादा अवताडे यांना निवेदन देऊन मागणी केली त्यांच्याकडे पाठपुरावा केला तेव्हा आमदार अवताडे यांनी या मागण्या योग्य व अचूक आहेत मी पाठपुरावा करून यासाठी निधी उपलब्ध करून देईन हा शब्द आमदार अवताडे यांनी पूर्ण केला असून मंगळवेढा शहरातील नगरपालिकेच्या प्राथमिक शाळेसाठी सुमारे साडेतीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे प्रत्यक्ष या कामाच्या निविदा प्रसिद्ध झाले असून लवकरच हे काम मार्गी लागून पूर्णत्वास येईल हे आता स्पष्ट दिसत आहे. निंबोणी येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर करून जागा उपलब्ध करून दिली आहे लवकरच या ठिकाणी इमारत उभी होणार आहे तर मंगळवेढ्यातील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाला असून 100 ते 200 खाट या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.
 सजग नागरिक संघ व आमदार समाधान आवताडे यांनी यापुढील काळात भविष्यात सर्व तालुक्याच्या विकासासाठी एकमेकांच्या हातात हात घालून काम केले तर शहरातील आरोग्य शैक्षणिक सुविधा ग्रामीण भागातील आरोग्य शैक्षणिक सुविधा आर्थिक सुसज्य व चांगल्या निश्चितपणे होतील असा विश्वास आता तालुक्यात व्यक्त केला जात आहे सजग नागरिक संघाचे प्रमुख संजय कट्टे, बिरुदेव जाधव वकील,ज्ञानदेव जावीर ,भारत पवार ,सिद्धेश्वर हेंबाडे, हनुमंतराव कोष्टी,विठ्ठल आसबे व त्यांचे सर्व सहकारी या सर्वांनी यापूर्वी दिल्ली येथे जाऊन तेथील प्राथमिक शाळा व आरोग्य केंद्राची पाहणी केली होती त्याप्रमाणे शहरात व ग्रामीण भागात काम सुरू केले कोमनार नाका येथे प्रायोगिक तत्त्वावर बाळासाहेब ठाकरे नावाने दवाखाना सुरू झालेला आहे एकूणच सजग नागरिक संघ मतदार संघाच्या कामात मंगळवेढा शहर व मंगळवेढा ग्रामीण भाग यासाठी आमदार समाधानदादा अवताडे यांना सहकार्य करण्यास तयार आहे तर सजग नागरिक संघाच्या हाकेला ओ देण्यासाठी दादासाहेब उठून उभे आहेत आमदार अवताडे व सजग नागरिक संघ यांच्या माध्यमातून मंगळवेढा शहर व तालुक्यात अजून अनेक विकासाची कामे चांगल्या पद्धतीने करता येतील असा विश्वास आता जनतेत निर्माण झालेला आहे यामुळे राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्व तालुक्याच्या विकासासाठी दादासाहेब अवताडे यांना सहकार्य करून त्यांच्याकडून शासनाकडून मिळणाऱ्या सर्व प्रकारचा निधी उपलब्ध करून घेऊन सर्व तालुक्याचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी सजग राहण्याची गरज निर्माण झाली आहे
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात आमदार अवताडे यांनी रस्त्यासाठी सुमारे पाचशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे मंगळवेढा मतदारसंघाच्या इतिहासात एखाद्या आमदाराने अवघ्या दीड दोन वर्षात 1700 कोटी रुपये चा निधी उपलब्ध केल्याची ऐतिहासिक कामगिरी आमदार अवताडे यांनी केली आहे यापूर्वी अशा प्रकारची कामगिरी कोणत्याही लोकप्रतिनिधीला करता आलेली नाही आमदार अवताडे यांनी 24 गाव पाणी योजनेसाठी आपली पूर्ण प्रतिष्ठा पणाला लावली असून उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून या योजनेला या बजेट अधिवेशनात किंवा अधिवेशन संपल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत मंजुरी व निधी उपलब्ध होऊन या पाणी योजनेचे भूमिपूजन निश्चित होईल अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे दरम्यान पंढरपूर येथील एमआयडीसीची कामे मार्गी लागली असून यादेखील कामाचे भूमिपूजन होणे हा औपचारिक पणा राहिला आहे पूर्वी मंगळवेढा मतदारसंघाला निधी मिळवण्यासाठी लोकप्रतिनिधीला व त्यांच्या प्रयत्नाला मर्यादित यश मिळत होते आमदार अवताडे यांनी आघाडी सरकार असताना सुद्धा 200 कोटी रुपये चा निधी मतदार संघाला मिळवला होता आता तर महायुतीचे सरकार येण्यासाठी  मैलाचा दगड बनलेले आमदार अवताडे हे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघासाठी निधी मिळवणारे आमदार म्हणून सुपरीचीत झाले आहेत.

Post a Comment

0 Comments