Type Here to Get Search Results !

संतसूर्य

रिद्धी सिद्धी महागणपतीची कलश यात्रा उत्साहात 
मंगळवेढेकराचा उत्स्फूर्त सहभागातून संतांच्या प्रतिमांची मिरवणूक

मंगळवेढा /प्रा. विक्रांत पंडित

 तब्बल चार दशकांच्या प्रतिक्षेनंतर उभारण्यात आलेल्या रिध्दि सिध्दी महागणपती मंदीर मुर्ति स्थापनेच्या निमित्ताने आजपासून 
ढोलताशे, झांज पथक, उंट, घोडे, कलशधारी महिला, संबळवादक, सजवलेल्या बैलगाडा,पुष्पवृष्टी व शाळेतील विद्यार्थ्यांच्या मोठ्या घोषणा, जयघोशात  नागरिकांनी उत्फुर्त सहभाग नोंदवला 
       सकाळी सात ते नऊ या वेळेत आरंभ संभारधान दशरूनान प्रशिक्षित होम शांती होम प्रधान संकल्प श्री गणेश पूजन पुण्य वचन मातृत्व पूजन नांदी श्राद्ध आचार्यवर्णी आणि उदक शांती मंदिर परिसरामध्ये पार पडल्यानंतर सांगली संस्था गणेश मंदिर बाजार चौकातून श्रींच्या प्रतीकात्मक व देवतांच्या साधू संतांच्या प्रतिमांची मिरवणूकीत शहरातील इंग्लिश स्कूल, दामाजी हायस्कूल, ताराबाई हायस्कूल, जवाहरलाल हायस्कूल, लक्ष्मीबाई दत्तू प्रशाला, ज्ञानदीप प्रशाला, नूतन मराठी विद्यालय, या शाळेतील विद्यार्थ्यांनी या मिरवणुकीमध्ये सहभाग घेत ढोल ताशे झांज पथक गोफ विणणे लेझीम आधी प्रात्यक्षिकाद्वारे प्रतिमांच्या मिरवणुकीमध्ये सहभाग नोंदवला
मंदिर परिसरामध्ये दुपारच्या सत्रात मंगळवेढा शहर व तालुक्यातील सर्व महिला भजनी मंडळाच्या वतीने भजन सादर करण्यात आले.दुपारी मंडपपूजन, देवता स्थापना, अग्नी स्थापना, जलाधिवास, ग्रहययज्ञ, शय्याधीवास, धान्यधिवास, सांयपूजा व आरती आदी कार्यक्रम झाले.सायंकाळी सात वाजता भक्ती संगीत रजनी हा सारेगमप हे मराठी सिनेमातील सुप्रसिद्ध गायक ज्ञानेश्वर मेश्राम यांच्या कार्यक्रमास उदंड प्रतिसाद दिला.

Post a Comment

0 Comments