डॉ. राजलक्ष्मी काळुंगे-गायकवाड यांना कारखानदारी मधील राष्ट्रीय पातळीचा पुरस्कार
भारतीय शुगरने वुमेन आयकॉन ऑफ इंडियन शुगर इंडस्ट्रीज या पुरस्काराने केले सन्मानित
मंगळवेढा/ विक्रांत पंडित
मंगळवेढा (प्रतिनिधी) साखर कारखानदारीमध्ये देशातील एकमेव महिला म्हणून काम करणाऱ्या खर्डी येथील श्री सदगुरू सीताराम महाराज साखर कारखान्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजलक्ष्मी काळुंगे- गायकवाड यांनी नावलौकिक प्राप्त केला असून राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या भारतीय शुगर पुणे या संस्थेने डॉ. राजलक्ष्मी काळुंगे- गायकवाड यांना राष्ट्रीय पातळीवरील ' वुमेन आयकॉन ऑफ इंडियन शुगर इंडस्ट्रीज ' पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
हा पुरस्कार सोहळा दिनांक 10 फेब्रुवारी रोजी सयाजी हॉटेल कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला होता. सदर प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे एएनएसआय कानपूर चे संचालक प्रा. नरेंद्र मोहन यांच्या हस्ते व भारतीय शुगरचे चेअरमन विक्रमसिंह शिंदे, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर संग्रामसिंह शिंदे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार डॉ. राजलक्ष्मी काळुंगे- गायकवाड यांना प्रदान करण्यात आला.
या पुरस्कार सोहळा प्रसंगी सिताराम शुगरचे मुख्य प्रवर्तक तथा धनश्री व सिताराम परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे, सिताराम शुगरच्या चेअरमन प्रा. शोभाताई काळुंगे, धनश्री परिवाराच्या ॲड. दिपाली काळुंगे-पाटील, स्नेहल काळुंगे- मुदगल, धनश्री मल्टीस्टेटचे व्हाईस चेअरमन युवराज गडदे, युवा उद्योजक सुयोग गायकवाड, कायदेशीर सल्लागार ॲड. शैलेश हावनाळे, सिताराम अर्बनचे संचालक संजय चौगुले, दत्तात्रय सुर्यवंशी, सिताराम शुगरचे जनरल मॅनेजर हनमंत पाटील यांचेसह चिफ इंजिनिअर एस. बी. रोंगे, सिव्हील इंजिनिअर आर. एस. वायदंडे, को-जन मॅनेजर ए. बी. गाजरे, इस्माईल आतार, ओंकार घोडके, सागर मासाळ यांच्यासह इतरजन उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी कष्ट करून उत्पादित केलेल्या मालास योग्य दर मिळणे आवश्यक आहे. शेतीतील उत्पादनावरच शेतकऱ्यांचे भविष्य अवलंबून असते. शेतीमालास योग्य दर मिळाला तर बळिराजाच्या चेहऱ्यावर जे हास्य येते ते वेगळेच असते. सीताराम महाराज साखर कारखान्याला ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य दर देण्याचा प्रयत्न उद्योजिका डॉ. राजलक्ष्मी काळुंगे- गायकवाड या करत आहेत.
वैद्यकीय शिक्षण घेऊन वैद्यकीय व्यवसाय न करता अनुभव नसलेले साखर उद्योगाचे क्षेत्र निवडले. या साखर उद्योगाला डॉ. राजलक्ष्मी काळुंगे-गायकवाड यांनी मुख्य प्रवर्तक प्रा. शिवाजीराव काळुंगे व शोभाताई काळुंगे यांच्या मार्गदर्शनाखाली उभारी दिली. खासगी साखर कारखानदारीच्या माध्यमातून शेतकरी व कामगारांना त्याची देयके वेळेत अदा करून बंद कारखाना पुन्हा नावारूपाला आणण्यात डॉ. राजलक्ष्मी काळुंगे-गायकवाड आदर्श महिला कारखानदार ठरल्या आहेत. या सर्व गोष्टीचा अभ्यास करून सन 2023 - 24 या वर्षाकरिता भारतीय शुगर पुणे या संस्थेने 'वुमेन आयकॉन ऑफ इंडियन शुगर इंडस्ट्रीज' या
पुरस्कारसाठी त्यांची निवड केली. या पुरस्काराची निवड ही देशभरातील कारखानदारी मधून केली जाते. भारतीय शुगरच्या या राष्ट्रीय पुरस्कारामुळे श्री. सद्गुरू सिताराम महाराज कारखान्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
Post a Comment
0 Comments