Type Here to Get Search Results !

संतसूर्य

मंगळवेढेचे श्री रिद्धी सिद्धी महागणपती मंदिर अष्टविनायक सारखे लौकिक मिळवणारे ठरेल -  वैभव नागणे
मंगळवेढा /प्रा. विक्रांत पंडित

पंढरपूर देव भूमी पासून 23 किमी अंतरावर मंगळवेढा ही संतांची भूमी असून पंढरपूर मंगळवेढा रोडवर उभारल्या गेलेल्या या श्री रिध्दी सिद्धी महागणपती  मंदिरामुळे महाराष्ट्र राज्याच्या धार्मिक वैभवात भर पडली आहे. तब्बल 40 वर्षा पासून हे गणपती मंदिर उभारण्याचे काम कोळी परिवाराने सुरू केले. सुमारे 40 वर्ष अथक प्रयत्नानंतर हे मंदिर आता पूर्णत्वास आले आहे.अतिशय सुंदर, नक्षिदार व देखणे मंदिर  प्रत्येक भाविक भक्तांच्या सहजदृष्टीस येणार आहे   श्री रिध्दी सिद्धी महागणपती मंदीर समितीचे अध्यक्ष अशोक कोळी यांनी सांगीतले.
  मंगळवेढा शहरातील पंढरपूर रोडवरील श्री रिध्दी सिद्धी महागणपती मंदीर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने  दि.26 जानेवारी रोजी विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सत्संग समितीचे प्रमुख दादा वेदक यांच्या सूचनेनुसार सायंकाळी 5 वाजता महत्वपूर्ण बैठक विविध मान्यवरांच्या उपस्थितीत  झाली.यावेळी धनश्री परिवाराचे प्रा. शिवाजी काळुंगे,माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे, उद्योजक संजय आवताडे , विश्व हिंदू परिषदेचे प्रखंड मंत्री विक्रांत पंडित, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुहास जोशी, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस शशिकांत चव्हाण,सजग परिवाराचे संजय कट्टे ,पंचायत समितीचे माजी सभापती नंदकुमार पवार ,माजी नगराध्यक्ष प्रकाश गायकवाड ,संत दामाजी कारखाना कामगार संघटनेचे विठ्ठल गायकवाड, माजी नगरसेवक अजित जगताप माजी उपनगराध्यक्ष चंद्रशेखर कोंडूभैरी डॉ. शरद शिर्के डॉ. प्रीती शिर्के, प्रफुल्लता स्वामी, जयदीप रत्नपारखी, दिनेश पंडित, जितेंद्र राक्षे, प्रा.विनायक कलुभरमे,हजरत काझी, भारत पवार, हणमंतराव कोष्टी,दिव्यमराठी  चे तालुका प्रतिनिधी प्रशांत मोरे, पुढारीचे प्रतिनिधी प्रा .सचिन इंगळे, समाधान फुगारे यांचे सह मान्यवर उपस्थित होते.
   दि.12 फेब्रुवारी पासून दि.14 फेब्रुवारी पर्यंत रिध्दी सिद्धी महागणपती प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.यानिमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील संपन्न होणार आहेत.
   मंगळवेढा शहरातील सर्वात आकर्षक गणपती मंदिर सुरू झाले असल्यामुळे गणेशभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.मंगळवेढा संत भूमीत होणाऱ्या श्री रिद्धी सिद्धी महागणपती मूर्ती ची व इतर देवी देवता व साधू संतांच्या ५१ मुर्त्याची विधिवत प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन सोहळा आचार्य वेदमूर्ती प्रसाद जोशी, ऋषिकेश जोशी, श्री विठ्ठल रुक्मिणी वेद पाठशाळा मुंबई आदी गुरूजन यांच्या शुभ हस्ते बुधवार दि १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत होणार आहे. तरी या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात मंगळवेढा तालुक्यातील सर्व भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री रिद्धी सिद्धी महागणपती मंदिर समितीचे अध्यक्ष अशोक कोळी यांनी केले आहे.
   यावेळी श्री रिध्दी सिद्धी महागणपती मंदीर च्या प्राणप्रतिष्ठा सोहळा स्वागताध्यक्ष पदी उद्योजक वैभव नागणे यांची निवड करण्यात आली.
 या बैठकीसाठी शहरातील सर्व नागरिक, महिला तसेच विविध पक्षाचे पदाधिकारी, अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते, जेष्ठ नागरिक संघ, महिला मंडळ आदीं मान्यवर उपस्थित होते.
   कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय चेळेकर यांनी केले तर सूत्रसंचालन भारत दत्तू यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार अजित जगताप यांनी मानले.

Post a Comment

0 Comments